गोव्यात पुन्हा भाजपाचेच सरकार ; केंद्रीय नेत्या सुखप्रीत कौर

भाजपचेच सरकार (BJP government) सत्येवर येणार असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा केंद्रीय नेत्या तथा सरचिटणीस सुखप्रीत कौर (Sukhpreet Kaur) यांनी मांद्रे येथील भाजपा महिला मोर्चा सभेत केले.
गोव्यात पुन्हा भाजपाचेच सरकार ; केंद्रीय नेत्या सुखप्रीत कौर
BJP government again in GoaDainik Gomantak

मोरजी - देशाची नारी शक्ती हि देविचे रूप आहे, देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण याहीपुढे गावागावात फिरून तिथली, संस्कृती आणि संस्कार यांचा अभ्यास करणार आहे, नारी शक्तीच्या हातात आपला देश सुरक्षित आहे, आगामी काळातही राज्यात आणि देशात भाजपचेच सरकार (BJP government) सत्येवर येणार असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा केंद्रीय नेत्या तथा सरचिटणीस सुखप्रीत कौर (Sukhpreet Kaur) यांनी मांद्रे येथील भाजपा महिला मोर्चा सभेत केले. (BJP government again in Goa)

मांद्रे भाजपा महिला मोर्चा यांनी मांद्रे जिल्हा पंचायत सभागृहात राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्ताने महिला सभा 7 आयोजित केली होती. यावेळी मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे,मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब,महिला मोर्चा अध्यक्ष दीपा तळकर,राज्य उपाध्यक्ष एकता चोडणकर,उत्तर गोवा उपाध्यक्षा नयनी शेटगावकर, दीपश्री सोपटे, आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर,माजी सरपंच संगीता नाईक,केरी सरपंच सुरज तळकर,महिला सरचिटणीस शीतल नाईक,सपना मापारी, महिला नेत्या सावित्री कवळेकर,आदी उपस्थित होते.

BJP government again in Goa
Goa:आग्वाद किल्ला ‘दृष्टी’च्या घशात

सूत्रसंचालन श्रुती केरकर यांनी तर समीक्षा शिरोडकर,नयनी शेटगावकर, संगीता लिंगुडकर, वंदना आजगावकर, रजनी शिरोडकर,प्राची मांद्रेकर, अनिशा केरकर आदींनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले . नयनी शेटगावकर यांनी प्रास्ताविक केले.

केंद्रीय नेत्या श्रीमती कौर यांनी पुढे बोलताना, एक कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा प्रतप्रधान बनतो हि ताकत भाजपाची आहे.देशात एकरा महिलाना मंत्रिमंडळात स्थान दिले त्याशिवाय महिला मोर्च्याचा कार्यकर्त्या माजी उपाध्यक्ष यांचा समावेश आहे. येणारी सरकार हि महिलाना समर्पित असणार आहे .महिलांच्या प्रगतीसाठी केंद्रसरकार प्रयत्न करत आहे .

BJP government again in Goa
राज्यातील जनतेनं सोलर वीज यंत्राचा वापर करावा: वीजमंत्री काब्राल

17 राज्यात भाजपाचे सरकार

17 राज्यात भाजपचे सरकार आहे , त्यान महिला नैतृत्व पुढे येत आहे आणि हि किमया केवळ भाजपा पक्षातच घडू शकते

स्वदेशिला कपड्याना प्राधान्य देण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. त्यामुळे आजच्या दिनी अधिकाधिक महिलांनी हातमागच्या साड्या परिधान केलेल्या आहेत. त्या पारंपारिक व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी सरकार कार्यरत आहे. स्वदेशी कपड्यासाठी आता आम्हाला जागृत रहायला हवे असे कौर यांनी सांगितले .

आमदार दयानंद सोपटे

आमदार दयानंद सोपटे यांनी पूर्ण भाषण हिंदीत करत असताना संघटनात्मक कामामुळे भाजपा मजबूत असल्याचे सांगितले.

आपण गरीब मात्र मन मोठे

आमदार सोपटे यांनी बोलताना आपण चार वेळा निवडून आलो, एकदा जिल्हा पंचायत सदस्य व तीन वेळा आमदार झालो, आपण गरीब आहे आपण कडी महिलाना किंवा मतदाराना पैसे देवून सभना गर्दी करत नाही, जी महिला शक्ती आहे त्याना सरकारच्या विविध योजना मिळवून देतो, त्यामुळे महिला एकत्रित येतात असा दावा केला. आपण गरीब असलो तरीही आपले मन श्रीमंत आहे. आपल्या वाणीतून आपण लोकाना आकर्षित करतो असे सोपटे म्हणाले.

कॉंग्रेसचा आवाज मोठा मन छोटे

कॉंग्रेस पक्षाचे नेते आवाज मोठा करतात मात्र त्यांचे मन छोटे आहे असा दावा सोपटे यांनी केला.विरोधी पक्षाचे कार्य नगण्य असल्याने भाजपा परत सत्येवर येणार, असा विश्वास व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com