भाजप सरकारने केला गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांचा स्वप्नभंग: दिगंबर कामत

काँग्रेस सरकार (Congress government) सत्तेमध्ये आल्यानंतर गोवा चित्रपट अनुदान योजना पुन्हा एकदा सुरु करू आणि इफ्फीमध्ये गोमंतकीय सिनेमांना सन्मानाचे स्थान मिळवून देऊ
भाजप सरकारने केला गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांचा स्वप्नभंग: दिगंबर कामत
Digambar KamatDainik Gomantak

मडगाव: इफ्फीच्या (Iffi) अधिकृत विभागात गोमंतकीय चित्रपटांचा (Gomantakiya films) समावेश करण्यास भाजप सरकारची गोवा मनोरंजन संस्था असमर्थ ठरली असून, डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील राज्य सरकारने (State Government) गोमंतकीय चित्रपटांचा अपमानच केला आहे. स्वप्नसुंदरीच्या हस्ते 52 व्या इफ्फिचे उद्घाटन करणाऱ्या भाजप (BJP) सरकारने स्थानिक चित्रपट निर्मात्यांचे स्वप्न मात्र उध्वस्त केले आहे असा थेट आरोप विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी आज केला.

इफ्फीचे (Iffi) उद्घाटन आता अवघ्या काही तासांवर आलेले असतानाही गोवा मनोरंजन सोसायटीला तथाकथीत गोवा प्रिमीयर विभागातील निवडलेल्या सिनेमांची यादी देखील अद्याप जाहीर करता आलेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यातून स्थानिक चित्रपटाबद्दलची भाजप सरकारची अनास्था आणि असंवेदनशीलताच प्रखरपणे समोर येत आहे.

Digambar Kamat
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पायलटला मागणी पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

2012 मध्ये सत्तेमध्ये आलेल्या भाजप सरकारने नेहमीच स्थानिक गोमंतकीय चित्रपटांना दुय्यम स्थान दिले आहे हे मला यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट करायचे आहे. दर वर्षी विरोधी पक्षाने मागणी केल्यानंतरच इफ्फी मध्ये गोवा विभागाची घोषणा करण्यात येते. इफ्फीमध्ये मनोरंजन संस्थेच्यावतीने होणारी गोवा विभागाची घोषणा म्हणजे केवळ औपचारिकता असल्याची टीकादेखील दिगंबर कामत यांनी केली.

इफ्फीमध्ये आजघडीला गोमंतकीय सिनेमांची स्थिती नेमकी काय आहे? आणि यावर्षीच्या इफ्फीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या गोमंतकीय चित्रपटांना गोवा मनोरंजन सोसायटीच्यावतीने काय लाभ मिळणार आहे याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्ट करण्याची मागणी यावेळी कामत यांनी केली.

काँग्रेस सरकार (Congress government)सत्तेमध्ये आल्यानंतर गोवा चित्रपट अनुदान योजना पुन्हा एकदा सुरु करू आणि इफ्फीमध्ये गोमंतकीय सिनेमांना सन्मानाचे स्थान आम्ही मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी दिगंबर कामत यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com