'भाजप सरकारने नोकऱ्या देण्याचे जाहीर करुन युवकांची फसवणूक केली'

आम आदमी पक्ष प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आपचे नेते वाल्मिकी नायक यांनी केली.
'भाजप सरकारने नोकऱ्या देण्याचे जाहीर करुन युवकांची फसवणूक केली'
Aam Aadmi PartyDainik Gomantak

भाजप सरकारने (BJP government) दहा हजार सरकारी नोकऱ्या गोव्यातील (Goa) युवकांना देण्याचे जाहीर करून एकाप्रकारे येथील युवकांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचारी भाजप सरकारने फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी नोकऱ्यांची घोषणा करीत आहे. आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आपचे नेते वाल्मिकी नायक यांनी केली.

गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने राज्यात रोजगार यात्रा सुरू केली आहे. शुक्रवार आम आदमी पक्षाची रोजगार यात्रेला दाबोळीत उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी दाबोळीचे आपचे नेते प्रेमानंद (बाबू) नानोस्कर सीसेल रॉड्रिगीस, आपचे दाबोळीचे प्रमुख गीलरोय कॉस्ता, पांडुरंग कोल्हापुरे, शेख नुहा, सज्जन , माजी नगराध्यक्षा भावना ना नोस्ककर व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Aam Aadmi Party
मिरामार येथील झाडे नष्ट करण्याचे षडयंत्र

पुढे बोलताना वाल्मिकी नायक म्हणाले देशाबरोबर गोव्यात भाजप सरकारने सामान्य जनतेला आर्थिक रित्या कमजोर बनवून ठेवलेले आहे. गोव्यात विकासाच्या नावाने भाजप सरकारने भ्रष्टाचार माजविला असल्याची माहिती नायक यांनी दिली. आपच्या महिला नेत्या सिसेल रॉड्रिगीस यांनी गोव्यात आम आदमी पक्ष यशाच्या शिखरावर पोहोचत असून यात युवकांचा मोठा वाटा असल्याची माहिती त्यांनी दिली.

Aam Aadmi Party
विकासाच्या नावाखाली गोवा नष्ट करण्याचे प्रकल्प सरकारने हाती घेतले: आमदार विजय सरदेसाई

दाबोळीचे आपले नेते प्रेमानंद मानोस्कर म्हणाले की गोव्यात भाजप सरकारने सत्तेचा गैर प्रयोग करून येथील जनतेची फसवणूक केली आहे. राज्य सरकारने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून युवकांना कमजोर करण्याचे षड्यंत्र रचले असल्याची माहिती नानोस्कर यांनी दिली. आप पक्ष दाबोळीबरोबर गोव्यात बदल घडून क्रांती निर्माण करणार आहे. यात यंदाच्या महत्त्वाचा सहभाग असेल गोव्यातील शिक्षित युवकांचा असे नानोस्कर यांनी सांगितले. सदर दाबोळीत रोजगार यात्रेला सेंट जासिंन्तो बेटावरून सुरुवात झाली. नंतर आल्त दाबोळी, बोगमाळो, वाडे, नवेवाडे भागातून काढण्यात आली. याप्रसंगी दाभोळी मतदार संघात आम आदमी पक्षाच्या दोन प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उपस्थित आपच्या नेत्यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com