भाजपाचे सरकार सर्वसामांन्याचे सरकार

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

केंद्र आणि राज्यातील भाजपाचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार , त्याचे प्रश्न समस्या घेऊन पुढे जाणारे सरकार दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर पोचत आहे . सर्वसामान्याचे हित या सरकारमध्ये दडलेले आहे

मोरजी :  केंद्र आणि राज्यातील भाजपाचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार , त्याचे प्रश्न समस्या घेऊन पुढे जाणारे सरकार दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर पोचत आहे . सर्वसामान्याचे हित या सरकारमध्ये दडलेले आहे . असे उद्गार मांद्रेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमन दयानंद सोपटे यांनी मांद्रे येथे कार्यालयात मुख्यमंत्री निधीतून पावसाळ्यात ज्यांच्या घरांची नुकसानी झाली त्यांना मदतीचा धनादेश वितरित केल्यानंतर ते बोलत होते.

भाजपा मंडळ सरचिटणीस सागर तिळवे सुनील परब आदी उपस्थित होते.
आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना राज्याला आर्थिक चणचण असली तरी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आजपर्यंत गरिबांच्या किंवा सरकारी कोणत्याही योजना बंद केल्या नाहीत, त्याचाच एक भाग म्हणून यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात काही घरांचे झोपड्यांचे नुकसान झाले. अशा गरिबांना सरकारने मदतीचा हात दिला आहे. मांद्रे मतदार संघातील एकूण १० लाभार्थीना मदत वितरीत केल्याचे सांगितले.

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना एका बाजूने देशात महामारीचे संकट चालू तर दुसऱ्या बाजूने मोठ्या प्रमाणात पाऊस लागल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची नुकसानी झाली आहे. त्यामुळे कांद्याची टंचाई झाली, यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी प्रत्येक रेशन धारकाला प्रत्येकी तीन किलो माफक दराने कांदे उपलब्ध करून देण्याचा जो निर्णय घेतला त्याचे स्वागत करत असतानाच असा धाडसी आणि सर्वसामान्यांसाठी निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतच घेऊ शकतात, असे सांगितले.

संबंधित बातम्या