भाजप सरकारला एक मिनीट ही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही : दिगंबर कामत

digambar kamat.jpg
digambar kamat.jpg

पणजी : संपुर्ण देशात प्राणवायुच्या कमतरतेमुळे अनेक रुग्ण दगावण्याच्या धक्कादायक घटना घडत आहे. केंद्रातील भाजप सरकार जनतेला जगण्याचा मुलभूत हक्क देण्यास तसेच मृतांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यास पुर्णपणे अपयशी ठरले आहे. भाजप सरकारला एक मिनीट ही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशी घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.  दिल्ली उच्च न्यायालयाने काल वैद्यकीय प्राणवायुच्या कमतरतेबद्दल केंद्र सरकारला फटकारताना भाजप सरकारचे भांडवलशाही धोरण उघडे पाडले आहे. लोकांचे प्राण जात असताना सरकारला उद्योगांचे जास्त पडलेले आहे असे सांगत लोकांच्या जगण्याचे सरकारला काहीच पडलेले नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने नमुद करुन केंद्र सरकारला फटकारले आहे. याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे. (BJP government has no right to stay in power for one minute: Digambar Kamat) 

आज लोकांची प्राणवायुसाठी धडपड चालु असताना, केंद्रातील भाजप सरकार केवळ भाषणबाजी करण्यात व्यस्त आहे. केंद्र सरकारची कोविड हाताळणीतील असमर्थता आता स्पष्ट झाल्याने, राष्ट्रपतीनी दखल घेवून त्वरित राष्ट्रीय कृतीदल समितीची स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गेल्या वर्षी पतप्रधानांकडे कोविड हाताळणीसाठी कृती आराखडा तयार करण्याची मागणी केल्यानंतर, २३ मार्च २०२० रोजी मी पंतप्रधानांना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्याची मागणी केली होती. दुर्देवाने भाजप सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन " टाळी बजाव, थाली बजाव, दिया जलाव" उत्सव साजरे करण्यावर भर दिला, असे ते उपरोधिकपणे म्हणाले.

मागील आठ महिन्यांत कोविडची दुसरी लाट येणार याची माहिती असुनही सरकारने स्वत:ची जाहिरातबाजी करण्यात वेळ वाया घालविला. आज दगावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातलगांना कित्येक तास ताटकळत रहावे लागत आहे. या सरकारकडे  नैतिकता व संवेदनशीलता शिल्लकच राहीलेली नाही, असे त्यांनी नमूद केले. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधायक सुचनांकडे भाजप सरकारने जाणीवपुर्वक काणाडोळा केला. चार दिवसांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी योग्य उपाय योजना सुचविण्यासाठी माजी पंतप्राधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पत्र लिहिल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी त्यांच्यावर नाहक टीका केली व त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या नाकर्तेपणामुळे आज देशवासीयांना कोविड मृत्युच्या जबड्यात ढकलले आहे असे कामत म्हणाले. आज देशात बदल आणण्याची वेळ आली असून, त्याची सुरूवात आतापासुनच झाली पाहिजे. जनतेने भाजप सरकारच्या बेजबाबदार व असंवेदनशील कारभाराची आताच दखल घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com