राजीव गांधींनी घटकराज्याचा दर्जा दिलेल्या गोव्याला भाजपने केंद्रशासित केलं

The BJP government made Goa a Union Territory
The BJP government made Goa a Union Territory

सासष्टी: भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी(Former Prime Minister of India late. Rajiv Gandhi) यांनी गोव्याला(Goa) घटकराज्याचा दर्जा दिला, तर स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करण्याचे काम केले, परंतु भाजप सरकारने आज राज्याची स्थिती केंद्रशासित प्रदेशासारखी(Union Territory) करून टाकली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत(Digambar Kamat) यांनी केला. (The BJP government made Goa a Union Territory) 

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात काल आयोजित केलेल्या आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, प्रदेश कॉंग्रेसचे सुभाष फळदेसाई, दामोदर शिरोडकर, जिल्हा कॉंग्रेसचे पिटर गोम्स, ॲड. येमन डिसोझा, रॉयला फर्नांडिस आदी उपस्थित होते.

केंद्रातील कॉंग्रेस सरकारचे गोव्यासाठी खास योगदान होते. स्व. राजीव गांधी यांनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला. कोकणीला राजभाषेचा दर्जा व घटनेच्या आठव्या परिशिष्टात स्थान राजीव गांधींमुळेच मिळाले हे सत्य आहे. गोव्यावर केलेल्या उपकारांसाठी गोमंतकीय नेहमीच त्यांचे ऋणी राहतील, असे दिगंबर कामत यांनी सांगितले. आज राज्यातील भाजप सरकारला केंद्रातील भाजपचेच सरकार किंमत देत नाही. राज्य सरकारचा रिमोट आज दिल्लीतील नेत्यांच्या हातात आहे. यामुळेच गोमंतकीयांना त्रास व कष्ट सहन करावे लागत आहेत, असेही ते म्हणाले.

"संपूर्ण देशात कोविड संसर्गाची सर्वाधिक लागण झालेल्या राज्यात गोवा अगदी वरच्या स्थानावर आहे. गोव्यात ऑक्सिजन अभावी 74 जणांचे प्राण गेले असून आज कोविड लसीकरण व चाचणी यात गोवा अगदी शेवटच्या पातळीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत गोव्याला स्थान देण्यात आले नाही. यावरून भाजप सरकारला गोवा व गोमंतकीयांच्या यातनांचे काहीच पडलेले नाही हे स्पष्ट होते. सध्याच्या परिस्थितीत गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे बोलणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य होते," असे दिगंबर कामत यांनी सांगितले. 

"स्व. राजीव गांधी यांनी संघीय प्रणालीचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार दिला. नगरपालिका व पंचायतींना मजबूत बनविण्याचे काम स्व. राजीव गांधीनी केले.  कॉंग्रेस पक्ष माणुसकीला सेवा देऊन पाळणार आहे. भाजप सरकार देशात कोविड लसीकरण करण्यासाठी चाचपडत असताना, देशवासीयांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची उणीव भासत आहे," असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com