जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी उत्तर गोव्यातून 'कार्तिक कुडणेकर' तर दक्षिण गोव्यातून 'सुवर्णा तेंडुलकर'

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 7 जानेवारी 2021

  उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी कार्तिक कुडणेकर तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी सुवर्णा तेंडुलकर यांचे नाव भाजपने निश्चित केले आहे.

पणजी :   उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी कार्तिक कुडणेकर तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी सुवर्णा तेंडुलकर यांचे नाव भाजपने निश्चित केले आहे. पक्षीय पातळीवर ही निवडणूक झाली होती. भाजपने दोन्ही जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये निर्विवाद बहुमत मिळवले आहे. 

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पदासाठी दीक्षा कांदोळकर तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पदासाठी खुशाली वेळीप यांचे नाव पक्षाने निश्चित केले आहे. जिल्हा पंचायत सदस्य, गाभा समिती आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ही नाव निश्चिती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या