भाजपचा मडगावंकरांसाठी हक्काचा सेवा सेतू

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

भाजपने दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

पणजी: भाजपने दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ख्रिस्ती बहुल अशा या तालुक्यात भाजपला अपवाद वगळता यश मिळालेले नाही. त्यामुळे आता मडगाव मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी भाजपने निकराचे प्रयत्न चालवले आहेत. 

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी महिनाभरात तीन वेळा दक्षिण गोव्याचा दौरा केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे काल रात्री उशिरापर्यंत मडगावमध्ये एका कार्यकर्त्याच्या विवाह सोहळ्यात होते. मडगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत करतात. 

मडगावातील जनतेला सरकार दरबारी कामांत मदत करण्यासाठी भाजपच्या मडगाव मंडळ समितीने ९८६००४१२२२ ही हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यावर नागरीक विविध सेवा व मदतीसाठी संपर्क साधू शकतील.

आणखी वाचा:

पणजी पालिका मार्केट व्यापारी संघटनांना विश्‍वासात न घेता ७ जानेवारीपर्यंत दुकाने बंद -

संबंधित बातम्या