भाजप जनतेचे मुख्य मुद्द्यांवरून लक्ष भटकवत आहे: आप गोवा युनिट

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपने वापरलेली वाईट भाषा निषेधार्ह आहे: आप गोवा युनिट
भाजप जनतेचे मुख्य मुद्द्यांवरून लक्ष भटकवत आहे: आप गोवा युनिट
Valmiki Naik Dainik Gomantak

पणजी : भाजप गोवा युवा मोर्चाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन केल्याचा दावा आप गोवा युनिटने केला आहे. तेजिंदर बग्गा प्रकरणावरुन असे करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या दहनाचा आप गोवा युनिटने निषेध केला. (BJP is distracting people from main issue)

Valmiki Naik
गोव्यात ब्लॅक पँथरचा वावर; विश्वजित राणेंनी शेयर केला फोटो

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना आप नेते वाल्मिकी नाईक, सुरेल तिळवे आणि राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष सिद्धेश भगत म्हणाले, “आम्ही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिल्लीत पाठिंबा देण्यासाठी बग्गा यांच्या घरी भेट देताना पाहिले आहे आणि आम्ही लोकांना अरविंद केजरीवालांचा पुतळा जाळताना पाहिले आहे. आम्ही याचा निषेद करतो,’’ असे ते म्हणाले.

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपने वापरलेली वाईट भाषा निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या विषयांना हात घालून भाजप एलपीजी, डिझेल, पेट्रोल दरवाढ यासारख्या मुख्य मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष भटकवत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.