सिद्धेश श्रीपाद नाईक यांचा ‘कोवॅक्सिन’च्या चाचणीत सहभाग

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

भाजपचे युवा नेते सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या ‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीत एक स्वयंसेवक म्हणून भाग घेतला.

 

पणजी :  भाजपचे युवा नेते सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या ‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीत एक स्वयंसेवक म्हणून भाग घेतला.

धारगळ - पडणे येथील रेडकर हॉस्पिटल आणि संशोधन केंद्रात ही चाचणी घेण्यात आली. ‘एक स्वयंसेवक म्हणून या विधायक कार्याला हातभार लावताना मला अत्यानंद होत असून अधिकाधिक लोकांना अशा कार्यात सहभागी होऊन इतरांना प्रेरित करावे’, असे आवाहन सिद्धेश नाईक यांनी केले.
रेडकर हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राची ‘कोवॅक्सिन’ लस यशस्वी ठरवल्यास ‘कोविड-१९’ वर लवकर मात करण्यास मदत होईल, अशी आशा वैद्यकीय क्षेत्र बाळगून आहे.

संबंधित बातम्या