भाजप नेते विश्वजीत कृष्णराव राणे यांचा आपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये येण्याची माझी प्रेरणा स्व. मनोहर पर्रीकर यांची होती. सध्याच्या सरकारने तो विश्वास गमावला आहे वर्तमान स्थितीत अरविंद केजरीवाल यांचीच दृष्टी गोव्याचा कायापालट करू शकते.
भाजप नेते विश्वजीत कृष्णराव राणे यांचा आपमध्ये प्रवेश
BJP leader Vishwajit K Rane joins Aam Aadmi Party Dainik Gomantak

पणजी: भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते विश्वजीत कृष्णराव राणे (Vishwajeet Krishnarao Rane) मोठ्या संख्येने आपल्या समर्थकांसह काल आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये सामील झाले आहेत. विश्वजीत राणे यांनी भाजपसाठी मोठे काम केले आणि ते सक्रिय ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात पर्येमधून निवडणूक लढवली होती. उत्तर गोव्यातील सत्तारी येथे भाजप नेते विश्वजित के राणे यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

BJP leader Vishwajit K Rane joins Aam Aadmi Party
गोव्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांची बदली

"आम्ही काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष राज्यात सत्ता गाजवताना पाहिले आहेत मात्र सत्तरी भागात खरा बदल ते घडवून आणू शकलेले नाहीत. त्यांना फक्त स्वतःच्या विकासाची काळजी आहे, बाकी कशाचीही काळजी नाही असा संवाद राणे यांनी प्रसार माध्यमांशी साधला. जनतेचा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावरून विश्वास उडाला आहे आणि त्यांना नेतृत्वासाठी फक्त आप हाच योग्य पक्ष वाटतो आहे. त्यावेळी भाजपमध्ये येण्याची माझी प्रेरणा स्व. मनोहर पर्रीकर यांची होती. सध्याच्या सरकारने तो विश्वास गमावला आहे वर्तमान स्थितीत अरविंद केजरीवाल यांचीच दृष्टी गोव्याचा कायापालट करू शकते. त्यामुळे मी 'आप'मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे,"असे राणे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com