मडगाव पालिकेत दुसऱ्या टप्प्यात भाजपची मुसंडी; तीन उमेदवार विजयी

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

मडगाव पालिकेच्या मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलने मुसंडी मारली आहे.

मडगाव ः मडगाव पालिकेच्या मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलने मुसंडी मारली आहे. या टप्प्यातील मतमोजणी झालेल्या चारपैकी तीन प्रभागात वायब्रंट मडगाव पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.25 पैकी आतापर्यंत निकाल हाती आलेल्या 8 प्रभागांमध्ये गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलचे 4 तर भाजपच्या वायब्रंट मडगावचे 3 उमेदवार निवडून आले. प्रभाग 2 मधील मतमोजणी पुन्हा हाती घेण्यात आली आहे. (BJP leads in second phase in Madgaon municipality; Three candidates won)

फातोर्डा फाॅरवर्डचे उमेदवार आघाडीवर; पहिल्या चार प्रभागातील चारही उमेदवार विजयी

प्रभाग दोनची फेरमतमोजणी सुरु आहे. या प्रभागात फातोर्डा फाॅरवर्डचे जाॅनी क्रास्टो व वायब्रंट मडगाव पॅनलचे कालीदास नाईक यांच्यात अटीतटीची लढत झाली असून नाईक यांनी केलेल्या विनंतीवरून फेरमतमोजणी सुरु आहे, अशी माहिती वायब्रंट मडगाव पॅनलचे अध्यक्ष व माजी आमदार दामू नाईक यांनी दिली. फातोर्डा पाॅरवर्डचे फ्रान्सिस जोन्स (प्रभाग 1), लिंडन परेरा (प्रभाग 3) पूजा नाईक (प्रभाग 4), श्वेता लोटलीकर (प्रभाग 5) तर वायब्रंट मडगावचे सदानंद नाईक (प्रभाग 6), मिलाग्रीना गोम्स (प्रभाग 7) व कामिलो बारेटो (प्रभाग 8) हे निवडून आले आहेत. 

संबंधित बातम्या