दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निकालांमध्ये भाजप आघाडीवर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 डिसेंबर 2020

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालात भाजपने 4 जागा पटकावल्या आहेत, तर अपक्ष दोन ठिकाणी निवडून आले आहेत. खोला व रिवण मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

पणजी : दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालात भाजपने 4 जागा पटकावल्या आहेत, तर अपक्ष दोन ठिकाणी निवडून आले आहेत. खोला व रिवण मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. नुवे मतदारसंघात भाजपचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार ब्रिझी बारेटो आघाडीवर आहेत. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नुवे मतदारसंघात मतमोजणीच्या दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार शाणू वेळीप आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे यांचे ते समर्थक आहेत.

 

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २०० उमेदवारांचे भवितव्य आज होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे. कोविड काळात झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून उत्साह दिसला नसला तरी भाजप व काँग्रेसने दक्षिण व उत्तर गोव्यात बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे. मतांची टक्केवारी घटल्याने मतदारराजाने कल कोणाच्या बाजूने दिला आहे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. या निकालानंतर पुढील वर्षीच्या पालिका व २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. 
 

संबंधित बातम्या