फडणवीसांच्या गोवा टीममध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगेंची वर्णी

फडणवीस यांनी आपली गोवा टीम तयार केली आहे. यामध्ये आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh landge) यांना घेण्यात आले आहे.
फडणवीसांच्या गोवा टीममध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगेंची वर्णी
Mahesh landgeDainik Gomantak

देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. यामध्ये गोवा राज्याचही समावेश आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

याच पाश्वभूमीवर गोव्यात पुन्हा सत्ता येण्यासाठी भाजपनेही (BJP) जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गोवा प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. फडणवीस यांनी आपली गोवा टीम तयार केली आहे. यामध्ये आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh landge) यांना घेण्यात आले आहे. लांडगे यांना गोव्यातील म्हापसा मतदार संघाची (Mapusa Constituency) जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, गोवा निवडणूकीसाठी (Goa Elections) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहासंह (Union Home Minister Amit Shah) भाजपच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या आहेत. मागील महिन्यामध्ये नड्डा यांनी स्वत गोव्यात यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यावेळी मावळचे भाजप आमदार बाळा उर्फ संजय यांना फडणवीस यांनी आपल्या टीममध्ये घेवून त्यांच्यावर साकोली मतदारसंघामधून राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली.

त्यानंतर आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना फडणवीसांनी गोवा टीममध्ये घेतले आहे. लांडगे यांनी शुक्रवारी आणि शनिवारी म्हापसा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला. लांडगे दोन दिवस गोव्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यामध्ये ते समन्वयक बैठका घेऊन निवडणूकीची रणनिती आखणार आहेत. त्याचबरोबर पुढील आठवड्यात पुन्हा गोव्याला जाणार असून दहा दिवस थांबून पक्षांतर्गत प्रचाराची रणनिती ठरवणार असल्याचे लांडगे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. तूर्त तरी कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे प्रचारास गोव्यात बंधने आहेत. त्यामुळे सोशल मिडीया आणि डिजीटल मार्केटींगवर भाजपने भर दिला आहे.

शिवाय, गोव्यात नव्याने दाखल झालेल्या तृणमुल पक्षाचे आव्हान भाजपसमोर मोठे आहे. त्यामुळे भाजपने या आव्हानाचा सामना करण्यासाठी टीम फडणवीसला गोव्याच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे. या टीममध्ये भाजपमधील संघटन कौशल्यामध्ये काम करणाऱ्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्या नेत्यांना प्रत्येकी एका मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गोव्यात चाळीस जागा आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रलवादी कॉंग्रेसची आघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकूणच सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर होत असलेली आगामी विधानसभा निवडणूक बहुरंगी होणार यात काही शंकाच नाही. येत्या सोमवारी म्हापसा मतदार संघासंह इतर ठिकाणचे भाजपचे उमेदवार निश्चित होणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या गोवा टीमच्या हालचालींना तीव्र वेग येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com