भारतीय जनता पक्षाचे आमदार बाबूश ‘कोरोना पॉझिटिव्‍ह’; शिगमोत्‍सव रद्द

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

भारतीय जनता पक्षाचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती त्‍यांनी सोशल मीडियावर आज दिली.

पणजी: भारतीय जनता पक्षाचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती त्‍यांनी सोशल मीडियावर आज दिली. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्यानंतर 22 मार्च रोजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली होती. त्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित समर्थकांसोबत बाबूश मोन्सेरात यांनी विजयोत्सव साजरा केला होता. त्‍यामुळे कार्यकर्ते व त्‍यांच्‍या संपर्कात आलेले सर्वजण धास्‍तावले आहेत.

महापालिकेच्या 30 पैकी 25 जागा बाबूश मोन्सेरात आणि भाजप यांच्‍या ‘टुगेदर फॉर अ प्रोग्रेसिव्ह पणजी’ या पॅनलला मिळालेल्या होत्या. निवडणूक निकालानंतर बाबूश मोन्सेरात हे शेकडो समर्थकांसमवेत फिरले होते. त्‍यानंतर शुक्रवारी त्‍यांनी कोरोना तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोना संसर्गित झाल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी आपल्या सोबत किंवा आपल्या संपर्कात गेले दोन दिवस जे जे व्यक्ती आले होते त्या सर्वांनी कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन  मोन्सेरात यांनी केले आहे.

पणजी महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी बाबूश मोन्सेरात सध्या तयारी करत असताना त्यांना कोरोना संसर्गित व्हावे लागल्यामुळे पुढील काही दिवसात  होणाऱ्या पणजी महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्यावेळी बाबूश मोन्सेरात यांना पणजी महापालिकेत उपस्थित राहता येणार नाही.

प्रतिदिन शंभर रुग्‍ण वाढताहेत
आरोग्य खाते राज्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या कमी व्हावी व गोव्यातील कोरोना महामारी नियंत्रणात यावी, यासाठी विविध तऱ्हेने प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, दिवसाला शंभराच्यावर नवे कोरोना संसर्गित रूग्ण गेले काही दिवस सातत्याने सापडत आहेत. 

प्रतिमा कुतिन्हो यांचा आप प्रवेश; केजरीवालांची घेतली भेट

आजच्या दिवसात 2123 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 113 नवीन कोरोना संसर्गित रुग्ण सापडले, अशी माहिती आरोग्य खात्याने आपल्या पत्रकातून दिली आहे. आजचा दिवसभरात एका कोरोनाबाधित व्यक्तीचे निधन झाले. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे निधन पावलेले व्यक्तींची संख्या 824  झालेली आहे. आजच्या दिवशी 113 नवे कोरोना संसर्गित सापडले. त्याच्या जोडीने 111 कोरोना संसर्गित बरेही झाले आहेत. 
आजच्या दिवशी 1279 व्यक्ती कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यामध्ये पणजी शहर आरोग्य केंद्रात तपासणी केलेल्या 155 व्यक्तीचा समावेश आहे. तसेच मडगाव इस्पितळांत तपासणी केलेल्या 127, पर्वरी आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी केलेल्या 113 आणि फोंडा येथील इस्पितळात तपासणी केलेल्या 113 या शंभरावर संख्या असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.  आजच्या दिवशी कोरोना संसर्गित व्यक्ती बरे होण्याची राज्यातील टक्केवारी 96.33 टक्के एवढी झालेली आहे.

दिवंगत मनोहर पर्रिकरांनी दाखवलेला विश्वास, त्यांनी दिलेले आशीर्वाद आणि त्यांचे संस्कार यामुळेच हे शक्य झाल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले

शिगमोत्‍सव रद्दचा निर्णय योग्‍यच : आरोग्‍यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात वाढलेल्या कोरोना संसर्गित रुग्णांची दखल घेऊन पर्यटन खात्यातर्फे आयोजित शिमगोत्सव रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून विश्‍वजित राणे यांनी आपण यापूर्वीच तशी सूचना वैयक्तिकरीत्या केली होती, असे म्हटले आहे. शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहतात. त्यामुळे  राज्यात वाढलेल्या कोरोना संसर्गित रुग्णांची दखल घेऊन शिमगोत्सव रद्द करण्याची आपली भूमिका होते ती मुख्यमंत्र्यांनी उचलून धरल्याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करत करत असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर गोव्यातील नागरिकांनी कोरोना नियंत्रणासाठी एसओपीचे पालन करावे. मोठ्या संख्येने एकत्र जमू नये, सुरक्षित अंतर ठेवावे, तोंडाला मास्क लावावा. स्वत:ची काळजी घ्यावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

भारतात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या