'अखेर सत्ताधारी भाजपला जाग आली'

गोव्यात सुरु असलेले प्रचाराचे कार्यक्रम तात्पुरते थांबवण्याची घोषणा
'अखेर सत्ताधारी भाजपला जाग आली'

BJP state president Sadanand Tanawade

Dainik Gomantak

पणजी : गोव्यात सत्तेस असलेल्या भाजपला अखेर जाग आली आहे. कारण गोव्यात गेले काही दिवस सर्रासपणे सुरु असलेले कार्यक्रम तात्पुरते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी कार्यक्रम थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>BJP state president Sadanand Tanawade</p></div>
गोव्यात ओमिक्रॉनचे आणखी 8 बाधित सापडले

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांनी आपला प्रचार जोरात सुरु केला आहे. मात्र सध्या गोव्यात पर्यटन हंगामही सुरु असल्याने कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गोव्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. यातच भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारसभा राज्यभरात आयोजित केल्या होत्या. ज्यामुळे समूह संसर्गाची भीतीही वाढली आहे. यातच भाजपने सध्या सुरु असलेले सर्व प्रचाराचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. मात्र घरोघरी जात प्रचार सुरुच राहणार असल्याचंही सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी स्पष्ट केलं आहे.

<div class="paragraphs"><p>BJP state president Sadanand Tanawade</p></div>
गोव्यात ओमिक्रॉनचे आणखी 8 बाधित सापडले

भाजपने (BJP) जरी आपले जाहीर कार्यक्रम पुढे ढकलले असले तरीही इतर पक्षांच्या सभा, बैठका, मोर्चे सुरुच आहेत. कन्हैया कुमारचा गोव्यात (Goa) राजभवनावरही मोर्चा एक प्रकारे कोरोना संसर्गाला आमंत्रण ठरु शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार अशा प्रचारसभांना जाणं टाळणं गोमंतकीय जनतेसाठी फार महत्त्वाचं आहे. तसेच भाजपसारखाच निर्णय इतर पक्षांनीही घेणं सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com