कुडचडे भाजपाचा सेवा सप्ताह उत्साहात

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

कुडचडे भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताह म्हणून विविध उपक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी वीजमंत्री निलेश काब्राल यांच्या हस्ते गरजू लोकांना मोफत चश्‍मा वितरण करण्यात आले.

कुडचडे: कुडचडे भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताह म्हणून विविध उपक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी वीजमंत्री निलेश काब्राल यांच्या हस्ते गरजू लोकांना मोफत चश्‍मा वितरण करण्यात आले. यात भाजपा मंडळ, महिला मोर्च्या, युवा मोर्च्याचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  शंभर गरजू लोकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. मतदारसंघात स्वच्छता अभियान राबविताना कदंब बस स्थानक, सूडा मार्केट, मुख्य बाजारपेठ ते रेल्वे स्टेशन, तिळामळ, गणेमराड, बेतमड्डी, संतोषि माता मंदिर परिसरात मोहीम राबविण्यात आली. 

सफाई कामगार, व्हडलें मळ काकोडा, शिरवई पेडमळ भागातील अल्पसंख्यांक आणी गरीब लोकांना फळांचे वितरण करण्यात आले. शिवाय आंबेडकर चौक, नियोजित कदंब बस स्थानक परिसर, वस्त वाडा परिसरात ओषधी वनस्पती रोपट्यांची लागवड करण्यात आली.   या सर्व कार्यक्रमात मंडळ अध्यक्ष विस्वास सावंत, सरचिटणीस राजेंद्र वस्त, माजी अध्यक्ष अशोक नाईक, महिला मोर्च्या अध्यक्ष रजनी नाईक, अनिता नाईक प्रीती पिंगळे, सिद्धार्थ गावस देसाई, नगरसेवक, पंच इतर प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

संबंधित बातम्या