मयेतून भाजपने भंडारी समाजाला उमेदवारी द्यावी

भाजपने ही मागणी डावलून भंडारी समाजाचा विचार केला नाही,तर मतदारसंघात वर्चस्व असलेल्या भंडारी समाज बांधवांना वेगळा विचार करावा लागणार आहे.
BJP should give candidature to Bhandari community from Mayem constituency
BJP should give candidature to Bhandari community from Mayem constituencyDainik Gomantak

डिचोली: आगामी निवडणुकीसाठी (Goa Election) भाजपने (BJP) मये मतदारसंघातून भंडारी समाजातील (Bhandari Community) नेतृत्वालाच उमेदवारी द्यावी. अशी जोरदार मागणी डिचोली तालुका भंडारी समाजाने काल (रविवारी) सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. भाजपने ही मागणी डावलून भंडारी समाजाचा विचार केला नाही,तर मतदारसंघात वर्चस्व असलेल्या भंडारी समाज बांधवांना वेगळा विचार करावा लागणार आहे. असे समाजाचे डिचोली तालुका अध्यक्ष आनंद नार्वेकर यांच्यासह ओंकार कानोळकर, अविनाश होबळे, श्रीपाद कारबोटकर आणि अनिल उसगावकर यांनी स्पष्ट केले.

BJP should give candidature to Bhandari community from Mayem constituency
Goa: मगोवासी झालेले प्रेमेंद्र शेट भाजपच्या जाळात?

मये मतदारसंघात सुशिक्षित आणि समाजकार्याची तळमळ असलेले भंडारी समाजातील अनेक नेते आहेत. तरीदेखील प्रामुख्याने मयेतील एक युवा नेतृत्व रुपेश ठाणेकर यांना भाजपची उमेदवारी द्यावी. अशी आग्रही मागणी तालुका भंडारी समाजाने केली आहे. भंडारी समाज बांधवाला उमेदवारी मिळाली, तरच आम्ही काम करणार आहोत. असे आनंद नार्वेकर आणि इतरांनी स्पष्ट केले आहे.

BJP should give candidature to Bhandari community from Mayem constituency
Goa: भ्रष्ट भाजपला रोखण्यासाठी काँग्रेससोबत युती; सरदेसाई

मयेत वर्चस्व

मये मतदारसंघात भंडारी समाजाचे वर्चस्व आहे.परंतु उमेदवारीच्या बाबतीत भंडारी समाज उपेक्षित आहे. भंडारी समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी. अशी यापुर्वीही मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत या समाजाचा निवडणुकीपुरता वापर करण्यात आला आहे. मतदारसंघात भंडारी समाजाचे जवळपास 16 हजार म्हणजेच 50 टक्क्याहून अधिक मतदार आहेत. भंडारी समाज एकसंघ आहे. मये मतदारसंघात भंडारी समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास, विजय निश्चित आहे. असा विश्वास आनंद नार्वेकर यांच्यासह इतरांनी व्यक्त केला आहे. यावेळी भंडारी समाजाला उमेदवारी डावलल्यास समाजाला निश्चितच वेगळे पाऊल उचलावे लागणार. असे अविनाश होबळे यांनी सांगून, भाजपने भंडारी समाजाबाहेरील अन्य उमेदवाराचा विचार करण्याची चूक करू नये. असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com