Goa BJP : ‘गोव्याच्या अल्पसंख्याकांनी भाजपवर विश्वास दाखवावा’

भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी व्यक्त केले मत
Anthony Barbosa
Anthony BarbosaDainik Gomantak

Goa BJP : ख्रिस्ती अल्पसंख्याक आणि आदिवासी मतदारांची सख्या अधिक असलेल्या त्रिपुरातील अल्पसंख्याक मतदारांनी जसा भाजपवर विश्र्वास दाखविला, तसाच विश्वास गोव्यातील अल्पसंख्याकांनी दाखवायला हवा, असे मत भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा (Anthony Barbosa) यांनी व्यक्त केले.

Anthony Barbosa
Sadetod Nayak: जनआंदोलनात फूट पडल्याचा ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’चा नकार

त्रिपुरा आणि नागालँड ही ईशान्य भारताची दोन्ही राज्ये नुकतीच भाजपने जिंकली,त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना बार्बोजा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासवर्धित प्रशासनाला या दोन्ही राज्यांतील मतदारांनी दिलेला हा कौल आहे.

भाजप हा अल्पसंख्याक विरोधी पक्ष नसून तो सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष हे आता गोव्यातील अल्पसंख्यांकानीही पटवून घ्यायला पाहिजे.

लोकसभा निवडणूक होणार आहे, त्यात दोन्ही जागावर भाजप उमेदवार निवडून येण्याची गरज व्यक्त करताना मागच्या काही वर्षांत प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याने बरीच प्रगती केली आहे. दोन्ही जागांवर भाजपला विजयी करण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com