भाजपच्या प्रदेश कार्यकारी समितीची उद्या म्हापशात बैठक

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

भाजपच्या प्रदेश कार्यकारी समितीची महत्वाची बैठक २६ रोजी म्हापशात होणार आहे. या बैठकीत महत्वाच्या राजकीय घोषणा आणि ठराव संमत केले जाणार आहेत. कोविड महामारीनंतर भाजपच्या पूर्ण कार्यकारिणीची होणारी ही पहिलीच बैठक आहे.

पणजी: भाजपच्या प्रदेश कार्यकारी समितीची महत्वाची बैठक २६ रोजी म्हापशात होणार आहे. या बैठकीत महत्वाच्या राजकीय घोषणा आणि ठराव संमत केले जाणार आहेत. कोविड महामारीनंतर भाजपच्या पूर्ण कार्यकारिणीची होणारी ही पहिलीच बैठक आहे.

सध्या भाजपने विविध मोर्चाच्या अध्यक्षांची निवड जाहीर करणे सुरू केले आहे. भारतीय जनता महिला मोर्चाच्या अध्यक्षाचीही निवड लवकरच जाहीर केली जाणार आहे. सध्या या पदावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत कार्यरत आहेत. भाजपने प्रत्येक पदावर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरवल्‍याने या पदावरही नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे.

जिल्हा पंचायत, पालिका, विधानसभा, पंचायती अशा निवडणुका आता होणार असल्याने भाजपने त्यासाठी तयारी सुरु केली आहे. सरकराच्या कामगिरीचा आढावा घेत सरकार जनतेसाठी काय करू इच्छीते याविषयीचा राजकीय ठराव या बैठकीत संमत केला जाणार आहे. एकंदरीत काही धाडसी व महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जाणार आहेत.

संबंधित बातम्या