गोव्यात भाजप आज सत्तास्थापनेचा दावा करणार

नाराज विश्वजीत राणेंना दुसऱ्या क्रमांकाचं पद मिळण्याची शक्यता, लवकरच शपथविधी
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीनंतर रखडलेला सत्तास्थापनेचा दावा अखेर मार्गी लागणार आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपचे नेते राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी 5 वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा भाजप नेते कऱणार आहेत.

Pramod Sawant
भाजपच्या जाहीरनाम्याचा समावेश राज्याच्या अर्थसंकल्पात?

सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपचे (BJP) सर्व आमदार आणि अन्य नेते राजभवनावर जातील. आज भाजपचे केंद्रीय निरीक्षकही गोव्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. काल रविवारी काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि विश्वजीत राणे दिल्लीमध्ये दाखल झाले होते. दोघांचीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बैठक झाली. बैठकीनंतर प्रमोद सावंत गोव्याला परतले, मात्र विश्वजीत राणे गोव्यात न परतल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या होत्या.

दरम्यान विश्वजीत राणेंची (Vishwajit Rane) मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आता काही लपून राहिलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीतही राणेंची नाराजी दूर झाली नसल्याचं एकंदरित चित्र दिसून येत आहे. त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं जाणार आहे. यात उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रीपदही दिलं जाऊ शकतं. गोव्यात गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडेच ठेवलेलं असतं. आता ही जबाबदारी देऊन राणेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. नाराज विश्वजीत राणे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसल्याचं चित्र आहे.

Pramod Sawant
मंत्रिमंडळात बदलाची शक्यता; मुख्यमंत्री परतले राणे दिल्लीतच

राज्यपालांची भेट घेण्यापूर्वी भाजपचे आमदार आपल्या विधीमंडळ नेत्याची निवड करतील. केंद्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली सर्व घडामोडी होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता सर्व भाजप आमदार आणि नेते राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. यानंतर शपथविधीची तारीखही ठरवली जाणार आहे. गोव्याच्या नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी ताळगावातील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर जय्यत तयारीही सुरु असल्याची माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com