नावेली मतदारसंघात प्रथमच भाजप रिंगणात दिसणार

मतविभाजनाचा लाभ कोणाला होणार, यावर निवडणुकीचे चित्र ठरणार आहे.
Goa Politics BJP
Goa Politics BJPDainik Gomantak

मडगाव: सासष्टीतील नावेली मतदारसंघात प्रथमच यावेळी भाजप रिंगणात दिसणार असल्याने व त्यात आपनेही जोरदार मुसंडी मारल्याने बहुरंगी लढत होणार असून मतविभाजनाचा लाभ कोणाला होणार, यावर निवडणुकीचे (Goa Elections) चित्र ठरणार आहे.

Goa Politics BJP
गोविंद गावडेंच्या मतांचे मडकईतून प्रियोळात स्थलांतर?

29 हजारांवर मतदार असलेल्या नावेलीत गेल्यावेळी म्हणजे 2017 मध्ये अवघे 62 टक्के मतदान झाले होते व तत्कालीन कॉंग्रेसचे लुईजिन फालेरो दहा हजारांवर मते मिळवून विजयी झाले होते. भाजपाने पाठिंबा दिलेले आवेर्तान फुर्तादो दुस-या तर सिप्रू कार्दोज (तिस-या) स्थानावर आले होते. यावेळी तशी स्थिती नाही. यावेळी आवेर्तान फुर्तादो कॉंग्रेस उमेदवारीवर तर उल्हास तुयेकर हे भाजपच्या, प्रतिमा कुतिन्हो आपच्या तर वालंका आलेमांव तृणमूलची उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

हा मतदारसंघ जरी कॅथोलिक बहुल असला तरी अन्य मतदारांची संख्या तशी नगण्य नाही व त्यात येथे येऊन स्थायिक झालेले परप्रांतीयही कमी नाहीत. सगळेच हिंदु जरी भाजप मतदार नसले तरी आप (AAP)तृणमूलमुळे (TMC) येथील समीकरणे उलटसुलट झालेली आहेत. आपच्या प्रतिमा कुतिन्हो यांचे महत्व कमी नाही त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच निवडणुकीसाठी कंबर कसून काम सुरु केले होते. तीच गोष्ट भाजपच्या उल्हास तुयेकर यांची. ते जिल्हा पंचायत सदस्य असल्याने तुलनेने महत्वाच्या असलेल्या दवर्ली जिल्हा पंचायत मतदारसंघावर त्यांनी पकड मजबूत केलेली आहे.

Goa Politics BJP
Goa Elections 2022: कुंकळ्ळीत कोण बाजी मारणार?

यापूर्वी सतत भाजपने (BJP) पाठिंबा दिलेला उमेदवारच नावेलीतून आमदार झालेला आहे, पण यावेळी भाजपनेच स्वतःचा उमेदवार उभा करून आपल्या मतदारांना एक नवी संधी दिलेली आहे, त्यामुळे त्या पक्षाला आपले मतदार नेमके किती आहेत, ते कळणार आहे. दुसरीकडे भाजपचेच सत्यविजय नाईक पक्षाऐवजी स्वतंत्रपणे रिंगणात उतरून अपशकून करतात, की काय ते पहावे लागेल. तीच गोष्ट कॉंग्रेसची (Congress) त्या पक्षाच्या उमेदवारीवर दावा करणारे रेहान मुजावर यांनी उमेदवारी न मिळाल्याने केलेली बंडखोरी त्या पक्षाला कितपत महागात पडेल, त्यांच्या बरोबर नेमके कितीजण जातील,ते इतक्यात सांगता येणार नाही.

तृणमूलतर्फे चर्चिल आलेमाव कन्या वालंका नावेलीत उभी असली तरी वडिलांच्या पुण्याईचा तिला विशेष लाभ मिळेल,असे संकेत अजून तरी दिसत नाहीत. त्यामुळे लढत कॉंग्रेस, भाजप व आप मध्येच होईल व मतविभाजनावरच निवडणुकीतील विजय अवलंबून असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com