आत्मनिर्भर भारत योजनेतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर गोवा स्वयंपूर्ण होणार

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

कार्यकर्त्यांनी अफवांना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेतून झटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर निश्चितपणे गोवा स्वयंपूर्ण होणार असल्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुडचडे येथे व्यक्त केला.

कुडचडे कुडचडे हा भाजपच्या हक्काचा मतदारसंघ आहे. कार्यकर्त्यांनी अफवांना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेतून झटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर निश्चितपणे गोवा स्वयंपूर्ण होणार असल्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुडचडे येथे व्यक्त केला.

ते भारतीय जनता पार्टी कुडचडे मतदारसंघातील निवडक कार्यकर्त्यांच्या दोन दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वीजमंत्री निलेश काब्राल, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, मंडळ अध्यक्ष विस्वास सावंत, महिला मोर्च्या अध्यक्ष रजनी नाईक व सरचिटणीस राजेंद्र वस्त उपस्थित होते. 

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, की २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप परत सत्ताधारी बनणार आहे. उद्‍घाटन समारंभानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली. आगामी वर्ष निवडणूक वर्ष असल्याने कार्यकर्ते कशा पद्धतीने विरोधकांना प्रत्युत्तर देणार, सरकारी योजनांची माहिती कशी संकलित करावी, जनतेसमोर विकासकामांची यादी कशी सादर करणार इथपासून कार्यकर्ता कसा असावा याची विचारणा प्रत्येक कार्यकर्त्यांकडून करून घेत असताना प्रसार माध्यमांसमोर काय आणि कसे बोलावे याचे बारकावे कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. 

दोन दिवस चालणाऱ्या कार्यकर्ता शिबिरातून पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित राहून आपापली तासिका घेणार आहे. संघटन बांधणीसाठी आवश्यक माहिती निवडक कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. यावेळी वीजमंत्री नीलेश काब्राल म्हणाले, की सरकार काय काम करते हे दोन दिवशीय शिबिरातून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याची माहिती तुम्ही इतर कार्यकर्त्यांना देण्याची आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार गोव्याची गरज पूर्ण करण्यासाठी झटत आहे. अशाप्रसंगी कार्यकर्त्यांनी सरकारच्या आणि पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करीत कुडचडे मतदारसंघातील हॉस्पिटल, नियोजित कदंब बसस्थानक आदी विकासकामांना गती देण्याची मागणी केली.

संबंधित बातम्या