'गोव्यात बहुमताने निवडून येणार'

मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी पणजीतील सभेत व्यक्त केला विश्वास
'गोव्यात बहुमताने निवडून येणार'

Chief Minister Pramod Sawant

Dainik Gomantak 

पणजी : गोव्यात भाजप बहुमताने निवडून येणार. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप 22 हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. पणजीत आयोजित भाजप मंडळाच्या कार्यकर्ता संमेलनात भाजपलाच मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

<div class="paragraphs"><p>Chief Minister Pramod Sawant</p></div>
भाजपाने आर्लेकरना प्रवेश देत साधला डाव

2012 ते 2022 या दहा वर्षांच्या काळात भाजपने गोव्यात केलेला विकास पाहून गोमंतकीयांनी मतदान करावे. निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यात दाखल झालेल्या पक्षांच्या आश्वासनांचा विचार करण्याआधी गोव्यात भाजपने केलेली कामं विचारात घ्यावी, असं आवाहनही प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केलं आहे.

गोव्याच्या (Goa) विकासासाठी केंद्र सरकारने तब्बल 804.24 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच साडेतीन हजार कोटींच्या 8 नव्या प्रकल्पांनाही केंद्राने मान्यता दिली आहे, या योजनांच्या माध्यमातून गोव्याचा विकास करण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

<div class="paragraphs"><p>Chief Minister Pramod Sawant</p></div>
‘तृणमूल’ गोळा करते महिलांची खासगी माहिती

पणजीतून बाबूशना उमेदवारी

गोवा विधानसभेसाठी पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात (Babush Monserratte) यांनाच उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. या जागेसाठी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रीकरही आग्रही होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com