जिल्हा पंचायत निवडणुकीत पुन्हा भाजपच मोठा पक्ष

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 14 डिसेंबर 2020

राज्यातील ४९ जिल्हा पंचायत जागांसाठी आतापर्यंत ३६ मतदारसंघातील निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये भाजपने बाजी मारली असून पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे. 

पणजी-  राज्यातील ४९ जिल्हा पंचायत जागांसाठी आतापर्यंत ३६ मतदारसंघातील निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये भाजपने बाजी मारली असून पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे. 

आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांत भाजपला २४, काँग्रेसला ३ , मगोला २ , राष्ट्रवादी काँग्रेसला १ तर ६ अपक्ष उमेदवारांना विजय मिळवण्यात यश आले आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. भाजपने ४१ उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. तसेच काही अपक्ष उमेदवारांना भाजपने पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यात सरकार असलेल्या भाजपने या निवडणुकीत बाजी मारली आहे. 
 

संबंधित बातम्या