BJP
BJPDainik Gomantak

Ponda: तिवरे-वरंगाव, बेतकीवर भाजपची नजर!

‘मगोप’ गोटात सामसूम : पंचायतींची झाली ‘असूनी नाथ, मी अनाथ’ सम स्थिती

फोंडा: बेतकी - खांडोळा व तिवरे- वरंगाव या प्रियोळ मतदारसंघातील महत्त्वाच्या दोन पंचायती. दोन्ही पंचायतीत नऊ प्रभाग असल्यामुळे तिथेही समानता दिसते. राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे तसेच मंत्री गावडे हे पुन्हा निवडून आल्याने पंचायती भाजपकडे वळणार अशीच चिन्हे आहेत. परंतु ‘मगोप’च्या गोटात सामसूम असून पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर हे या राजकारणात लक्ष घालताना दिसत नाहीत. यामुळे ‘मगोप’चे वर्चस्व असूनही दोन्ही पंचायतीची स्थिती ‘असूनी नाथ मी अनाथ’ झाली आहे.

बेतकी खांडोळा क्षेत्रात बेतकी आरोग्यकेंद्र तसेच खांडोळा कॉलेज असल्याने तशी बरीच लगबग असते. या दोन्ही पंचायती शहरापासून दूर आहेत. ‘तिवरे -वरंगावात’ मिनी फोंडा असलेला माशेल हा गाव येत असल्याने या पंचायतीला ‘ग्लॅमर’ आहे. मंत्री गावडे समर्थक दिलीप नाईक हे बेतकी खांडोळ्याचे तर उन्नती नाईक या तिवरे वरंगावच्या सरपंच होत्या.आरजी भाजपला बरी लढत देईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ‘आप’ची विशेष चर्चा नसली तरी नोनू नाईक हे निवडणुकीत उतरले आहेत.

BJP
Panchayat Election: बार्देशात लोकप्रतिनिधींसह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

तिवरे- वरंगाव पंचायतीत गेली पाच वर्षे संगीत खुर्चीचा खेळच दिसून आला. संकेत आमोणकर यांच्या पत्नी प्रभाग ४ मधून लढत असून पंचायतीवर त्यांचा प्रभाव राहू शकतो. पूर्वी या दोन्ही पंचायती ‘मगोप’कडे होत्या. गत विधानसभा निवडणुकीतही या दोन्ही पंचायतीतून खास करून तिवरे-वरंगावातून दीपक ढवळीकर यांना लक्षणीय मते मिळाली होती.

बेतकी खांडोळ्यात बहुरंगी लढती

बहुतेक बलाढ्य उमेदवार अथवा त्यांच्या पत्नी वा सगे सोयरे रिंगणात उतरले असल्याने पंचायत राजकारणाला बहुरंगी स्वरूप आल्याचे दिसते. अजूनही मंत्री गावडे यांनी आपले पत्ते खोलले नसले तरी त्यांनी बेतकी खांडोळ्यातील कोणत्या उमेदवारांना समर्थन द्यायचे हे निश्‍चित केल्याचे त्यांच्या काही खास कार्यकर्त्यांकडून समजले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com