गोवाः चार पालिकांनावर फडकला भाजपचा झेंडा

दैनिक गोमंतक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

मडगाव पालिकेत 25 जागांपैकी भाजप पुरस्कृत पॅनलला फक्त 7 जागांवरच समाधान मानावे लागले.

पणजी: राज्यातील पाच पालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत मडगाव पालिका वगळता भाजप पुरस्कृत पॅनलने सांगे, केपे व मुरगाव पालिकांमध्ये निर्विवाद बहुमत मिळवले तसेच म्हापसा पालिकेत बहुमत मिळाले नसले, तरी दोन अपक्षांना घेऊन सत्तेचा दावा केला आहे. त्यामुळे चार पालिकांमध्ये भाजपची सत्ता स्थापन होणार आहे. मडगाव पालिकेत 25 जागांपैकी भाजप पुरस्कृत पॅनलला फक्त 7 जागांवरच समाधान मानावे लागले. गोवा फॉरवर्ड तसेच काँग्रेसने त्यांचा धुव्वा उडवत 17 जागा मिळवून अपेक्षेप्रमाणे निर्विवाद यश संपादन केले. (BJP's flag hoisted on four municipalities)

वळपई आठवडा बाजारात नागरिक विसरले सामाजिक अंतराचे  भान 

ही निवडणूक अटीतटीची होऊन काही आश्‍चर्यकारक निकाल येतील, अशी अपेक्षा काही उमेदवारांना होती. मात्र ती फोल ठरत भाजपने जो दावा केला होता तो खरा ठरला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मडगाव वगळता इतर चारही पालिकांमध्ये सत्ता स्थापन करणार, असे स्पष्ट सांगितले होते. त्यांचा हे भाकित खरे ठरले आहे. त्यामुळे मुरगाव, सांगे, केपे व म्हापसा या चार पालिकांवर भाजप समर्थक पॅनल सत्ता स्थापन करणार आहेत.

सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यावर केपे व सांगे पालिकेत कमी प्रभाग झाल्याने पूर्ण निकाल सकाळी 11 वाजताच स्पष्ट झाला. केपेचे माजी नगराध्यक्ष दयेश नाईक हे पुन्हा निवडून आले. प्रभाग फेररचना बदल होण्यापूर्वी ते बिनविरोध निवडून आले होते. मात्र या बदलानंतर त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. केपेमध्ये उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या भाजप पुरस्कृत पॅनलमधील 13 पैकी 9 जण निवडून आले. 3 जागा काँग्रेस पुरस्कृत पॅनलला तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. अपक्षाने काँग्रेस समर्थक पॅनलला पाठिंबा दिल्याने या पॅनलचे बळ 4 झाले आहे. केपेत माजी मंत्री प्रकाश वेळीप यांच्या मुलीने प्रथमच निवडणूक लढविली. मात्र, तिला पराभवाला सामोरे जावे लागले. केपेमध्ये कवळेकर गटाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. 

तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल १२ मे पर्यंत तहकूब

संबंधित बातम्या