''मडगाव पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार''

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

मडगाव पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केला. 

मडगाव ः भाजप विरोधी पक्षांचे वर्चस्व राहिलेल्या मडगाव पालिकेत या खेपेस वेगळे चित्र दिसणार असून मडगाव पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केला. 

मडगाव पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलच्या उमेदवारांनी येथील जिल्हाधिकारी कचेरीत आज भाज उमेदवारी अर्ज भरले. यावेळी आजगावकर पत्रकारांशी बोलत होते. भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलचे सर्व उमेदवार जनतेसाठी तळमळीने वावरणारे आहेत. या सक्षम उमेदवारांची टीम भाजपने या निवडणुकीत उतरवली आहे. मडगावच्या सर्वांगीण विकासासाठी मडगावकरांनी वायब्रंट मडगावच्या उमेदवारांना निवडून आणावे असे आवाहन त्यांनी केले. 

गोवा पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष सावंतांची आत्महत्या

भाजपचे पॅनल मडगाव पालिकेत सत्तेत येणार असून सरकारकडून पालिकेला चांगले सहकार्य मिळेल असे आजगावकर यांनी सांगितले. यावेळी वायब्रंट मडगावचे उमेदवार आर्थुर डिसिल्वा, राजेंद्र आजगावकर, रुपेश महात्मे,  सदानंद नाईक, सुगंधा बांदेकर, बबिता नाईक, रंजीता पै तसेच पांडुंर (भाई) नायक उपस्थित होते. 

संबंधित बातम्या