Goa: भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी घेतला आमदारांच्या कार्याचा आढावा

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

केलेल्या कामांचा फायदा​ येणाऱ्या काळात होईल असा कानमंत्र बी. एल. संतोष यांनी आज रात्री येथे सत्ताधारी आमदारांना दिला.

पणजी: कोविड (Covid19) काळात प्रत्येक आमदाराने (MLA) जनसेवेसाठी काय काय केले हे भाजपचे (BJP) राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी तपशीलवारपणे जाणून घेतले. भाजपच्या आमदारांशी त्यांनी राज्य विश्रामगृहावर चर्चा केली. यावेळी भाजपचे राज्य प्रभारी सी. टी. रवी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, खासदार विनय तेंडुलकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक आदी उपस्थित होते. संतोष यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. (BJP's National Organizing Secretary B.L. Santosh reviewed the work of MLAs)

बैठकीत अवाक्षराने विधानसभा निवडणूक होणार असल्याविषयी सूतोवाच करण्यात आले नाही मात्र निवडणुकीला सामोरे जाताना जनतेच्या मनात जागा निर्माण करा असा सल्ला संतोष यांनी दिला.

IVERMECTIN गोळ्यांचा वापर सरकारने अखेर थांबवला; गोवा खंडपीठात खटला दाखल

कानमंत्र असा...
कोविड काळात जनतेच्या गरजा समजून घेऊन त्यांच्यापर्यंत ती मदत पोचवण्यासाठी आमदारांनी काम केले पाहिजे. सर्वच कामे सरकारी यंत्रणेने करावी अशी अपेक्षा न बाळगता सरकारी यंत्रणा व पक्ष संघटना यांनी समन्वयाने कामे करावी. कोविड काळात केलेली मदत जनता विसरणार नाही, याचा फायदा येणाऱ्या काळात होईल असा कानमंत्र बी. एल. संतोष यांनी आज रात्री येथे सत्ताधारी आमदारांना दिला.

संबंधित बातम्या