सोनसडोवर उपाय काढण्यास भाजपचा अडथळा; विजय सरदेसाई

'लोबो यांनी भाजपच्या चुकीच्या कारभाराचा पर्दाफाश केला आहे'
 Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik gomantak

मडगाव : सार्वजनिक सुविधा राजकारणापेक्षा सर्वोच्च आहेत आणि यासाठी कचऱ्यावर राजकारण करू नका असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भाजपला सांगितले आहे आणि सोनसडो कचरा प्रश्नावर आणलेल्या सर्व उपायांना भाजप रोखत असल्याचा आरोप केला आहे. सोनसडो येथील कचऱ्याचा प्रश्र्न सोडविला नाही तर भाजप प्लेग सारख्या गंभिर आजाराला आमंत्रण देईल असे त्यांनी म्हटले.

नगरविकास मंत्रालयाच्या निष्क्रियतेमुळे सोनसडो कचरा प्रक्रिया प्रकल्पाची मंजुरी प्रलंबित असल्याच्या कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांच्या टिप्पणीचा संदर्भ देत फातोर्डाचे आमदार सरदेसाई म्हणाले की, लोबो यांनी भाजपच्या (BJP) चुकीच्या कारभाराचा पर्दाफाश केला आहे.

 Vijay Sardesai
गोव्यात भाजपला पराभूत करण्यासाठी ममता कॉंग्रेसचा हात धरणार?

सरदेसाई यांनी मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा आणि इतर नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेवून भाजपने कशा पद्धतीने सोनसडोचेही काम रोखले आहे त्याचा पर्दाफाश केला. भाजप नेते दामू नाईक यांनी सत्तेचा वापर करून सोनसडोचा उपाय रोखल्याचा आरोप त्यांनी केला. “मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि दामू नाईक हे डबल इंजिन असून, ते फातोर्डाच्या विकासाला खीळ घालत आहेत. त्यांनी सोनसडो येथील कचरा व्यवस्थापनाबाबत गोंधळ निर्माण केला आहे.’’ असे विजय सरदेसाई (Vijay Sardesai) म्हणाले.

“माझी सरकारला विनंती आहे की सोनसडोचा प्रश्न निकाली काढावा, जेणेकरून मडगाव, फातोर्डा आणि कुडतरी येथील लोकांना तात्काळ दिलासा मिळेल. ही समस्या आता सुटली नाही, तर पुढील अनेक वर्षे तशीच राहील.” असे सरदेसाई म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की मडगाव पालिकेने सोनसडो डंप यार्ड येथे 25 टीपीडी वीज निर्मितीसह दोन बायो-मिथेनेशन प्लांट उभारण्यासाठी ‘प्रस्तावासाठी विनंती’ केली होती. तथापि,यात सहभागी होण्यास इच्छुक कंपन्या असूनही, आणि पद्मश्री शरद काळे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने 11 डिसेंबर रोजी जागेची पाहणी करूनही, सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

 Vijay Sardesai
Omicron Variant : गोव्यात ओमिक्रॉनचा समूहसंसर्ग?

“मडगाव (Margao) पालिका सरकारकडे (Government) पैसे मागत नाही, ते 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून पैसे वापरत आहे. पालिकेला फक्त मंजुरी हवी आहे, पण ती सरकारकडून दिली जात नाही. त्यामुळे विरोधी आमदार असलेल्या मतदारसंघात भाजप कोणतेही काम चालू करायला तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे.’’असा आरोप सरदेसाई यांनी केला. अर्बन फॉरेस्टमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सुचना देणारे पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांचीही त्यांनी खिल्ली उडवली आणि याच काब्रालने मोले येथे एक लाख झाडे मारली असे म्हटले. “शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी अर्बन फॉरेस्ट आवश्यक आहे. मला त्याचे महत्त्व माहित आहे.” असे सरदेसाई म्हणाले. फातोर्डा येथील विकासकामे रखडल्याप्रकरणी संबंधित विभागाला नोटीस पाठवली असून, जनतेच्या हिताची ही कामे सुरू न झाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com