गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत; काँग्रेस मात्र बुचकळ्यात

रेजिनाल्ड, रोहन देवेंद्र फडणवीसांसोबत भेट!
गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत; काँग्रेस मात्र बुचकळ्यात
BJPs political planning in goa Dainik Gomantak

पणजी: एका बाजूला काँग्रेसने प्रादेशिक पक्षांसोबत युती करून भाजपसमोर प्रखर आव्हान उभे करण्याचा पवित्रा घेतलेला असतानाच भाजपने कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड यांना आपल्या नेत्यांना भेटण्यास बोलावले. रेजिनाल्डबरोबर सध्या भाजपला निकट गेलेले पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटेही भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यामुळे काँग्रेस बुचकाळ्यात पडली आहे.

आपने गिरीश चोडणकरांसह काही आमदार फडणवीस यांना भेटल्याचा आरोप केल्यामुळे राजकीय क्षेत्र पुरते ढवळून निघाले आहे. आलेक्स रेजिनाल्ड फडणवीसांना का भेटले हे जरी गुलदस्त्यात असले तरी भाजपची ही राजकीय चाल आहे. आलेक्स रेजिनाल्ड हे गेले काही महिने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संपर्कात आहेत, ही बाब वारंवार उघड झाली आहे. आमदार रोहन खंवटे आपला भाऊ राजेश खंवटे यांच्यासाठी उमेदवारी मागत आहेत. काँग्रेसला पेचात पकडण्यासाठीच खंवटे यांची ही चाल असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

BJPs political planning in goa
काँग्रेस प्रवक्ता ट्राजन डिमेलो यांची पक्षातून हकालपट्टी

सामान्य नागरिकांत असंतोष

राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असल्याने शहकाटशहाला वेग आला असला तरी पक्षीय ध्येय धोरणांना काही नेते तिलांजली देत असल्याने सामान्य नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. पणजीतील एक हॉटेल भाजपच्या डावपेचांचा अड्डा बनला आहे, त्याच हॉटेलमध्ये रेजिनाल्ड जेवायला आल्याने राजकीय शंका-कुशंकांचे वादळ गडद झाले आहे.

BJPs political planning in goa
'गोव्यातील अल्पसंख्यांकासाठी कॉंग्रेस महत्त्वाची भूमिका निभावणार'

रेजिनाल्ड यांना धास्ती...

मुळात कुडतरी हा भाजपला जनाधार नसलेला मतदारसंघ आहे, पण निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना आणि कुडतरीसारख्या ख्रिस्तीबहुल मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागत असल्याने आलेक्स रेजिनाल्डही याबाबत निर्णय घेताना काही प्रमाणात धास्तावलेले दिसत आहेत. सध्या ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणात त्यांचीही चिंता वाढली आहे. एका हॉटेलात मी जेवणासाठी गेलो. तेथे भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. ही भेट ठरवून नव्हती, तर तो योगायोग होता. मात्र, त्यांच्याशी पक्षांतरासंदर्भात कोणतीच बोलणी झाली नाही. त्यामुळे पक्षांतर करण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही. मी पक्षांतर करणार नाही. काँग्रेसची उमेदवार निवड प्रक्रिया तसेच प्रचारही सुरू झाला आहे. त्यामुळे आता मागे पाहणे नाही.

राज्यात भाजप काँग्रेस यांचे निवडणुकीनंतरचे ‘सेटिंग’ जनतेने २०१७ मध्ये पाहिले आहे. आता निवडणुकीपूर्वीच हे सेटिंग पाहायला मिळत आहे. आलेक्स रेजिनाल्ड आणि गिरीश चोडणकर हे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेच नाहीत हे त्यांनी जाहीर करावे.

- अमित पालेकर, आप नेते

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com