'भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलचे उमेदवार जाहीर'

BJPs Vibrant Madgaon panel candidate announced
BJPs Vibrant Madgaon panel candidate announced

मडगाव: पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मडगाव वायब्रंट पॅनलच्या उमेदवारांची आज उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व भाजपचे राज्य सरचिटणीस दामू नाईक यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली. पॅनलचे निमंत्रक राजेंद्र तालक यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा, राजेंद्र आजगावकर, भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य शर्मद रायतुरकर, माजी नगरसेवक रुपेश महात्मे, केतन करतरकर, सुगंधा बांदेकर यांचा त्यात समावेश आहे. माजी नगरसेवक सदानंद नाईक व बबिता नाईक या पतीपत्नीही भाजपच्या पॅनलतर्फे पालिका निवडणूक लढवणार आहेत.
शर्मद रायतुरकर हे विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार होते. वायब्रंट मडगाव पॅनलमध्ये समावेश करून मडगाव पालिका निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचा संदेश भाजपने दिला आहे. माजी उद्योगमंत्री दिवंगत बाबू नाईक यांचे नातू प्रभव पांडुरंग नाईक व माजी आमदार तथा स्वातंत्र्यसैनिक गजानन रायकर यांचे पूत्र पराग रायकर हेही या पॅनलतर्फे निवडणूक लढवणार आहेत. 

वायब्रंट मडगावचे प्रभागवार उमेदवार -
प्रभाग 1 डेन्झील मास्कारेन्हस, प्रभाग 2 कालिदास नाईक, प्रभाग 3 झिको आल्मेदा फर्नांडिस, प्रभाग 4 फ्रान्सिस बार्बोझा, प्रभाग 5 आर्थुर डिसिल्वा, प्रभाग 6 सदानंद नाईक, प्रभाग 7 मिलाग्रीना गोम्स, प्रभाग 8 गजानन (अमेय) करमली, प्रभाग 9 नर्मदा कुंडईकर, प्रभाग 10 तेरेझा नोरोन्हा, प्रभाग 11 जया आमोणकर, प्रभाग 12 शर्मद रायतुरकर, प्रभाग 13 केतन कुरतरकर, प्रभाग 14 राजेंद्र आजगावकर, प्रभाग 15 उदय देसाई, प्रभाग 16 अनिशा नाईक, प्रभाग 17 रुपेश महात्मे, प्रभाग 18 पराग गजानन रायकर, प्रभाग 19 मंगला हरमलकर, प्रभाग 20 आलिना राॅड्रिग्ज, प्रभाग 21 सचिन सातार्डेकर, प्रभाग 22 प्रभव पांडुरंग नाईक, प्रभाग 23 सुगंधा बांदेकर, प्रभाग 24 पार्वती पराडकर, प्रभाग 25 बबिता नाईक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com