आंबोली घाटात झाले "ब्लॅक पँथऱ"चे दर्शन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

सावंतवाडी परिसरात काही युवकांनी या ब्लॅक पँथरला पाहिले. परंतु, गाडी आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्याने दरीत उडी टाकून पळ काढला. 

आंबोली-  येथील घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्या ब्लॅक पँथरचे भर रस्त्यात दर्शन झाले. हा प्रकार काल सकाळी दहाच्या सुमारास घडला. सावंतवाडी परिसरात काही युवकांनी या ब्लॅक पँथरला पाहिले. परंतु, गाडी आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्याने दरीत उडी टाकून पळ काढला. 

 सात ते आठ वर्षांपूर्वी याठिकाणी आढळलेल्या ब्लॅक पँथरची पुन्हा एकदा आठवण झाली. याबाबतील चर्चेला वनविभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक यांनी दुजोरा देत आंबोली जंगलात यापूर्वी अनेकदा अशा प्रकारचे काळ्या रंगाचे पँथऱ आढळले आहेत, अस दावा त्यांनी यावेळी केला. घनदाट जंगलात राहत असल्याने त्यांचा रंग बदलतो असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.    

संबंधित बातम्या