राज्यात रेव्ह पार्ट्या सरकारच्याच आशिर्वादाने

विलास महाडिक
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

बॉलिवूड क्षेत्रातील कपिल झवेरी याला रेव्ह पार्टीप्रकरणी अटक झाल्याने राजकारणी व ड्रग्ज माफिया यांच्यातील लागेबांधे याला पुष्टी मिळत आहे. या रेव्ह पार्ट्या सरकारच्याच आशिर्वादाने होत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे. हे असेच सुरू राहिल्यास ‘उडता पंजाब’प्रमाणे ‘उडता गोवा’ होण्यास वेळ लागणार नाही, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विनोद पालयेकर यांनी केला.

पणजी
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह इतर काही मंत्री व आमदार तसेच खासदारांची भेट घेतलेला बॉलिवूड क्षेत्रातील कपिल झवेरी याला रेव्ह पार्टीप्रकरणी अटक झाल्याने राजकारणी व ड्रग्ज माफिया यांच्यातील लागेबांधे याला पुष्टी मिळत आहे. या रेव्ह पार्ट्या सरकारच्याच आशिर्वादाने होत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे. हे असेच सुरू राहिल्यास ‘उडता पंजाब’प्रमाणे ‘उडता गोवा’ होण्यास वेळ लागणार नाही, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विनोद पालयेकर यांनी केला. 
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना नशामुक्त भारत होण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. 
त्याला काही तास उलटण्यापूर्वीच गोव्यात शिवोली मतदारसंघातील हणजूण येथे रेव्ह पार्ट्याचा पर्दाफाश करण्यात आला. माजी मंत्री मिकी पाशेको यांनी राजकारणी व ड्रग्ज माफियांच्या लागेबांधेविषयी प्रश्‍न उपस्थित केला होता ते यावरून उघड होत आहे. राज्याचे नवे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांना या हितसंबंधाबाबत माहिती नसल्यानेच ही कारवाई झाली असावी. याप्रकरणाचा पर्दाफाश करूनही सरकारकडून काहीच कारवाई होत नाही. या प्रकरणात मुख्यमंत्रीच गुंतलेले असल्यास पंतप्रधानांनी यामध्ये हस्तक्षेप करून त्यांना सत्तेवरून पायउतार करावे व मुख्यमंत्री पदासाठी पात्र व कर्तबगार अशा मंत्री विश्‍वजीत राणे किंवा मंत्री मायकल लोबो यांची वर्णी लावावी अशी मागणी पालयेकर यांनी केली. 
हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस यांना कोणाचा आशिर्वाद आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे रेव्ह पार्ट्यांविरुद्ध कारवाई केली नाही तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. या पोलिस स्थानकात उपनिरीक्षक विदेश पिळगावकर आहे. गेली कित्येक वर्षे तो याच स्थानकात आहे. ड्रग्ज व वेश्‍या दलालांशी लागेबांधे असल्याने दोनवेळा त्याची बदली वाळपई येथे झाली होती मात्र एका महिन्यातच तो पुन्हा हणजूण स्थानकात बदली करून घेण्यात यशस्वी होत आहे. तो सरकारी जावई बनला असून सत्ताधारी आमदार व मंत्री त्याला तेथून हलवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. हणजूण येथील रेव्ह पार्टीमध्ये उच्चस्तरीय व किंमती ड्रग्ज सापडले आहेत यावरून या पार्ट्यांना सरकारची फूस आहे. चित्रपटसृष्टीतील ज्या सिनेतारक ड्रग्जमध्ये गुंतले आहेत व त्यांचा राजकारण्यांशी संबंध आहे अशा या राजकारण्यांना शासन करण्यासंदर्भातचे पत्र पंतप्रधान तसेच गोव्याच्या राज्यपालांना पाठवणार असल्याचे पालयेकर म्हणाले. 

विघ्नहर्त्याला आमदारांची प्रार्थना 
रेव्ह पार्ट्यांना उत्तेजन देऊन राज्यातील स्वाभिमानी गोमंतकियांची विल्हेवाट लावण्यास सरसावले आहेत त्यांना योग्य धडा शिकवावा व त्यांना राजकारणातून कायचे घरी बसवा तसेच गोव्याची संस्कृती अबाधित राहण्यासाठी सुप्रशासन द्यावे अशी प्रार्थना येत्या काही दिवसांपूर्वी येऊन ठेपलेल्या विघ्नहर्ता गणरायाकडे करतो, असे आमदार विनोद पालयेकर यांनी सांगितले. 

उद्‍घाटन निमंत्रणास नकार ः मंत्री गावडे 
रेव्ह पार्टीप्रकरणी अटक झालेला चित्रपट सिनेतारक कपिल झवेरी याच्याबरोबरचे काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यातील सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्टीकरण केले आहे की, लोकांचा प्रतिनिधी असल्याने मी सर्वांनाच भेटतो. त्यामुळे झवेरी याच्या पार्टीशी काही संबंध नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या भेटीसंदर्भात काही माहिती विचारल्यास ती आपणे देऊ. त्याने तिरुमला तिरुपती मल्टीपर्पज सहकारी पतसंस्थेच्या उद्‍घाटनाचे निमंत्रण आणले होते. मात्र, त्याला नकार दिला होता असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संपादन ः संदीप कांबळे
 

संबंधित बातम्या