Goa: दाबोळी आणि इंडिगोही अपयशी, पूर्ण अंध असलेल्या महिलेला झालेल्या त्रासाचे 'ती'नेच केले अनुभव कथन

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि इंडिगो कंपनीच्या विमानात आवश्यक सहाय्यता देण्यात आली आहे.
Dabolim Airport
Dabolim Airport Dainik Gomantak

दाबोळी विमानतळावर दिव्यांग असलेल्या एका ज्येष्ठ परदेशी महिलेकडून व्हिलचेअरसाठी खंडणी घेतली असल्याचा प्रकार समोर आला होता. इंग्लंडची रहिवाशी असलेल्या या महिलेने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर गोवा राज्य दिव्यांग व्यक्ती आयोगाने दखल घेत भारतीय विमानतळ प्राधिकरण, गोवाने तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

दरम्यान, दाबोळी विमानतळावरून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक अंध महिला प्रवाशाला विमानतळ आणि विमानात देखील दिव्यांग लोकांसाठी असणाऱ्या सुविधा मिळाल्या नाहीत अशी तक्रार त्यांनी केली आहे.

पायल कपूर या गोव्याहून हैदराबादला प्रवास करत असताना, त्यांनी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि इंडिगो कंपनीच्या विमानात आवश्यक सहाय्यता देण्यात आली आहे.

पायल कपूर यांना आलेल्या अनुभवाचे कथन त्यांनी यासंबधित ट्विट करत दिली आहे. कपूर यांनी पूर्ण अंधत्व असून, कमी ऐकू येते. विमानतळावर सहाय्यता करणारे कर्मचारी कपूर यांना वेटिंग लाउंजमध्ये सोडून गायब झाले. असा आरोप त्यांनी केला आहे.

कपूर हैदराबादमध्ये दिव्यांग सल्लागार म्हणून काम करतात. "मला मदत करण्यासाठी विमानतळाच्या प्रवेशद्वारावर एक कर्मचारी नेमून देण्यात आली. तिने सामान सोडण्यात आणि सुरक्षा तपासणीत मदत केली. त्यानंतर आम्ही बोर्डिंग गेटच्या बाजूला असलेल्या वेटिंग एरियामध्ये पोहोचलो, मला तेथे थांबवून ती परत येईल, असे तिने सांगितले पण ती परत आली नाही." असे पायल यांनी म्हटले आहे.

माझी श्रवणक्षमता देखील कमी आहे. माझ्या बोर्डिंगची वेळ जवळ येईल तशी मी विचलित झाले आणि घाबरले असे पायल यांनी सांगितले.

Dabolim Airport
Goa Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव जाहीर, गोव्यातील इंधनाचे ताजे दर जाणून घ्या

"सुदैवाने, बेंगळुरूला जाणार्‍या फ्लाईटमध्ये माझ्या सोबत एक मित्र होता. आम्ही दिव्यांगांना मदत करणारे कर्मचारी शोधत होतो पण कोणीही दिसले नाही. इंडिगोच्या कर्मचार्‍यांकडेही गेलो, पण त्याचा काही उपयोग झाला नाही."

"बोर्डिंग गेटच्या पलीकडे जाण्यासाठी मॅन्युअल असिस्टंट स्टाफ हा माझे एकप्रकारे डोळेच असतात. तेच माझ्या हाताला धरून फ्लाइट मध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन करतात, मला बसण्यास मदत करतात आणि केबिन क्रूला देखील कळवतात."

दरम्यान, कपूर यांच्यासाठी 20 मिनिटांनंतर मॅन्युअल असिस्टंट नियुक्त करण्यात आला. पण, त्याने केबिन क्रूला कपूर यांच्या अपंगत्वाची कल्पना न देताच सीटवर बसवून निघून गेला. यामुळे फ्लाइट क्रूने दाखविलेले सुरक्षा प्रात्यक्षिक कपूर अंध असल्याने पाहू शकल्या नाहीत.

दरम्यान, हैदराबादमध्ये उतरल्यानंतर कपूर यांना मॅन्युअल असिस्टंट मिळाला. इंडिगो कंपनीने याप्रकरणाची दखल घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.

"योग्य माहिती मिळाली नसल्यामुळे 6E 712 मधून प्रवास करणाऱ्या महिलेला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आम्ही सेवेत आणखी सुधारणा करत आहोत. आमच्या ग्राहकांना नेहमीच विनम्र आणि त्रासमुक्त सेवा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत." अशा शब्दात इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com