Manohar International Airport: ‘मोपा’वर ‘ब्ल्यू कॅप टॅक्सी स्टॅंड’चे आश्वासन हवेतच

‘ब्ल्यू कॅप टॅक्सी स्टॅंड’ देण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आश्वासन दिल्यास पंधरा दिवस उलटून गेले. पण या टॅक्सी स्टॅंडसाठी कसल्याही हालचाली दिसत नाहीत.
Manohar International Airport|Taxi Issue
Manohar International Airport|Taxi IssueDainik Gomantak

आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळावर पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांसाठी ‘ब्ल्यू कॅप टॅक्सी स्टॅंड’ देण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आश्वासन दिल्यास पंधरा दिवस उलटून गेले. (Mopa International Airport )

पण या टॅक्सी स्टॅंडसाठी कसल्याही हालचाली दिसत नाहीत. उलट मोपा विमानतळावर तालुक्याबाहेरील टॅक्सी धारक व्यावसायिक व्यवसाय करत आहेत.

सरकारने तातडीने आश्वासन पूर्ण न केल्यास आंदोलन छेडू, असा इशारा आज पत्रकारांशी बोलताना भास्कर नारूलकर यांनी दिला.

Manohar International Airport|Taxi Issue
Mahadayi Wildlife Sanctuary: म्हादई अभयारण्यात ‘व्याघ्रप्रकल्प’ संरक्षित करा

पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळावर टॅक्सी व्यवसायासाठी इच्छुक असलेल्यांना माहिती हक्क कायद्यांतर्गत काही प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, यासाठी ॲड. जितेंद्र गावकर ,भास्कर नारुलकर यांच्या नेतृत्वाखाली पेडणे वाहतूक कार्यालयाचे अधिकारी कमलाकर कारापुरकर यांना निवेदन देण्यात आले.

त्यानंतर पेडणे कदंब बस स्थानकात नारूलकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ॲड जितेंद्र गावकर उमेश तळवणेकर यांच्यासह सोबत टॅक्सी धारक उपस्थित होते.

यावेळी भास्कर नारूलकर म्हणाले की, 5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री,वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो व पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या सोबत पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर हे होते.

या घटनेला आता पंधरा दिवस उलटून गेले तरी विमानतळावर ब्ल्यू कॅप टॅक्सी स्टॅंड देण्याच्या दृष्टीने अजून कसल्याही हालचाली नाहीत.

Manohar International Airport|Taxi Issue
Bus Service: पेडणे केरी ते पणजी बस अनियमित; प्रवाशी त्रस्त

सरकारकडून टॅक्सी व्यावसायिकांची थट्टा !

सरकारने पेडणे वाहतूक कार्यालयात अर्थहिन अर्ज भरून द्या म्हणून आमच्या टॅक्सी धारकांची थट्टा चलवली आहे.

सरकार अशा प्रकारे आमची फसवणूक करत असल्याने विधानसभेवर मोर्चा ,वाहतूक कार्यालवार मोर्चा,मोपा विमानतळाबाहेर ‘चक्का जाम’ सारखी आंदोलन करण्याचे चर्चेअंती ठरवून निर्णय घेणार आहोत,असे भास्कर नारूलकर आणि जितेंद्र गावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com