बोडगेश्वर संस्थानची सभा ठरली वादळी

सभासदांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने प्रचंड विरोधाला सामोरे जात असल्यामुळे अध्यक्ष आनंद भाईडकर यांना अखेर सभा तहकूब करावी लागली.
Bodgeshwar Jatra in Mapusa Goa
Bodgeshwar Jatra in Mapusa GoaDainik Gomantak

म्हापसा : येथील श्री देव बोडगेश्वर संस्थानची नियमित सर्वसाधारण सभा बेकायदा असून, कोविड काळातील हिशेब व जमाखर्च सभेसमोर सादर न केल्याने महाजनांनी गंभीर आरोप-प्रत्यारोप केल्याने ही सभा वादळी ठरली. सभासदांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने प्रचंड विरोधाला सामोरे जात असल्यामुळे अध्यक्ष आनंद भाईडकर यांना अखेर सभा तहकूब करावी लागली.

रविवारी (31 जुलै) झालेल्या या सभेत माजी अध्यक्ष अ‍ॅड. महेश राणे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष नार्वेकर, बाळू फडके, अशोक गोवेकर, शशिकांत कांदोळकर, नरेश तिवरेकर, नंदकिशोर शिरगांवकर, संजय बर्डे, एकनाथ म्हापसेकर यांनी देवस्थानच्या गलथान कारभारावर तुफान हल्ला चढवला.

अनेक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला. अ‍ॅड. महेश राणे यांनी तर सभाच बेकायदा असल्याने त्वरित रद्द करावी, अशी जोरदार मागणी केली. या सभेस मंदिराशेजारील शेतकरीही आपल्या जमिनीत देवस्थान समितीने बेकायदा अतिक्रमण केल्याचा आरोप करीत सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अध्यक्षांना सभा तहकूब केल्याशिवाय पर्याय नव्हता .

Bodgeshwar Jatra in Mapusa Goa
‘ग्रेटर पणजी’ अखेर निकालात

दरम्यान, अशा आरोप-प्रत्यारोपामुळे देवस्थान बदनाम होत असल्याचे म्हापसेकरांचे मत आहे. अध्यक्ष आनंद भाईडकर म्हणाले की, सर्व सोपस्कर कायदेशीरपणे पूर्ण करुनच सभा आयोजिली होती. सन 2019-2020, 2020-2021 सालचा जमाखर्च व हिशेब लिखित स्वरुपात सादर केला. परंतु, सभासदांना तो मान्य नव्हता. त्यामुळे वादंग माजला. आपल्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com