हरवळे धबधब्यात बुडालेल्या युवकांचे मृतदेह लागले हाती

The bodies of the youths drowned in the waterfall were found in their hands
The bodies of the youths drowned in the waterfall were found in their hands

हरवळे धबधब्यात बुडालेल्या गोलू कुमार (वय-17) आणि  सत्यम कुमार (वय-18) या युवकांचे मृतदेह हाती लागले आहेत. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठविले आहेत.

पावसाळी पर्यटनासाठी मित्रांसमवेत आलेल्या २४ वर्षीय युवकाचा हरवळे धबधब्यावर बुडून दुर्दैवीरित्या अंत होण्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. बुडालेल्‍या युवकाचे नाव भालचंद्र वसंत पाटील असे असून, तो पीडीए कॉलनी-जुने गोवे येथील होता. 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार भालचंद्र पाटील हा आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत पावसाळी पर्यटनासाठी हरवळे धबधब्यावर आला होता. मित्रांसमवेत धबधब्याच्या पायथ्याशी आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने भालचंद्र पाण्यात गटांगळ्या खाऊ  लागला. मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली होती . तोपर्यंत भालचंद्र पाण्यात नाहीसा झाला. घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली लिडींग फायर फायटर रत्नकांत गावस यांच्या नेतृत्वाखाली बाबूराव गावस (चालक ऑपरेटर), उमेश गावकर, रुपेश पळ, विशाल वायंगणकर, आदित्य गावस, हर्षद गावस, आशिष मोर्लेकर या दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. (The bodies of the youths drowned in the waterfall were found in their hands)

दोन तासांच्‍या शोधमोहिमेनंतर मृतदेह सापडला दलाच्या जवानांनी यांत्रिकी बोटीच्या मदतीने तब्बल दोन तास पाण्यात शोध घेतल्यानंतर मृतदेह हाती लागला. डिचोली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रजीत मांद्रेकर यांनी घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बांबोळी येथे पाठवला आहे. दरम्यान, हरवळे धबधब्याच्या पायथ्याखालील परिसर आंघोळीसाठी असुरक्षित असतानाही, त्याठिकाणी आंघोळ करण्यास गेले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com