डिचोलीत बॉयलर कोंबड्या गायब.

boiler chicken
boiler chicken

डिचोली, 

कालपासून दरवाढ झाली असतानाच, आज डिचोलीतून बॉयलर कोंबड्या गायब झाल्या आहेत. आज (रविवारी) सायंकाळी शहरातील बहूतेक चिकन सेंटरमधून बॉयलर चिकन उपलब्ध नव्हते. त्यामुळे आज रविवारच्या दिवशीच चिकन मिळाले नसल्याने बहूतेकजणांना रिकाम्या हाताने परतावे लागले. बॉयलर कोंबड्यांची आवक होईपर्यंत बॉयलर चिकनचा तुटवडा निर्माण होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आधीच तुटवड्यामुळे कालपासून डिचोलीत बॉयलर कोंबड्या महाग झाल्या आहेत. बॉयलर कोंबडी प्रति किलो २०० रु. तर सुटे चिकन ३०० रु. प्रति किलो असे दर वाढले आहेत. त्यातच आता ते बाजारात बॉयलर चिकन मिळणे दुरापास्त झाल्याने चिकन खवय्यांची गैरसोय झाली आहे. टाळेबंदीपूर्वी बॉयलर कोंबडी प्रति किलो १२० रु. तर सुटे चिकन २०० रु. प्रति किलो असे दर होते. टाळेबंदी काळात मध्यंतरी काही दिवस बॉयलर चिकन महाग झाले होते. आता तर त्यात मोठी वाढ झाली आहे.
'टाळेबंदी' काळात मध्यंतरी स्थानिक वगळता राज्याबाहेरील बॉयलर कोंबड्यांवर बंदी आली होती. मात्र, टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्याबाहेरुन बॉयलर कोंबड्यांची आवक सुरू झाली होती. सध्या मासळी महाग त्यातच चांगल्या दर्जाची मिळत नसल्याने अनेकजण चिकनला पसंती देत आहेत. आता आणखी काही दिवस तरी चिकनसाठीही मारामारी सहन करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

goa goa goa 

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com