Railway : रेल्वेसाठी अन्य परवान्यांची गरज नाही

गोवा खंडपीठाने याचिका फेटाळली; तीनरेषीय प्रकल्पांना हिरवा कंदील
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak

Railway : राज्यात केंद्र सरकारच्या नियोजित तीनरेषीय प्रकल्पांना काही स्थानिकांचा दीड वर्षांपासून विरोध आहे. गिर्दोळी-चांदोर येथील काही स्थानिकांनी गाव भावांचो एकवटतर्फे गोवा खंडपीठात जनहित याचिका सादर केली होती. अध्यक्ष मिंगेल फ्रांसिस्को फेलिक्स फुर्दातो व इतर तीन याचिकादारांतर्फे मारिया कॅरोलिन कुलासो यांनी बाजू मांडली. रेल्वे प्रकल्पांसाठी विविध खात्यांची परवानगीची गरज नाही असे निरीक्षण नोंदवत कोर्टाने याचिका फेटाळली.

गिर्दोळी-चांदोर या परिसरातून जाणाऱ्या केंद्र सरकारच्या दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या कामाविरोधात स्थानिकांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होऊन गोवा खंडपीठाकडून राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. याचिका फेटाळल्याने आता प्रकल्पासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. रेल्वेच्या प्रकल्पासाठी रेल्वे कायद्यातील कलम 11 नुसार पंचायत, शहर व नगर विकास तसेच सीआरझेड प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्‍यकता नाही इत्यादी मुद्दे राज्य सरकारतर्फे सुनावणीवेळी उपस्थित करण्यात आले. हे मुद्दे ग्राह्य धरून ही याचिका फेटाळली अशी माहिती राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

Konkan Railway
CM Pramod Sawant : भारत विश्‍वगुरू व्हावा हेच पंतप्रधानांचे स्वप्न!

प्रकल्पासाठीचे आक्षेप काय?

या प्रकल्पासाठी दक्षिण पाश्‍चिमात्य रेल्वे अधिकारिणीने पंचायत, शहर व नगर नियोजन, सीआरझेड प्राधिकऱणाचे परवाने घेतलेले नाहीत. प्रकल्पामुळे या दुहेरी रेल्वे मार्गासाठी आवश्‍यक असलेल्या जमिनी ताब्यात घेण्यात येणार आहेत व त्यात अनेकांच्या खासगी जमिनी आहेत. त्यामुळे गिर्दोळी-चांदोर या परिसरातून जाणारा दुहेरी रेल्वे मार्ग रद्द करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकादारांनी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com