Colva : कचरा सुविधेवरुन खंडपीठाने कोलवा पंचायतीला झापलं; 90 हजारही केले जप्त

स्वेच्छा जनहित याचिकेवर गोवा खंडपीठात सुनावणी सुरू आहे
Court | Goa News
Court | Goa News Dainik Gomantak

Colva : कोलवा पंचायतीने दिलेल्या मुदतीत दुसऱ्यांदा कचरा विल्हेवाट सुविधा (एमआरएफ) उभी न केल्याने गोवा खंडपीठाने आज कोलवाच्या सरपंचांना चांगले धारेवर धरले. खंडपीठाने सरपंचाविरोधात कोणती कारवाई करता येईल, याची माहिती पंचायत संचालकांना देण्याचे निर्देश देत सुनावणी 31 जानेवारीला ठेवली आहे. कचरा विल्हेवाट सुविधा उभी करण्यासाठी पंचायतीने जमा केलेली 90 हजारांची रक्कमही कोर्टाने जप्त केली आहे.

Court | Goa News
Goa Crime : म्हापशात दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघे ताब्यात

गोवा खंडपीठात कचरा विल्हेवाट सुविधा उभी करण्यासंदर्भातची स्वेच्छा जनहित याचिकेवरील सुनावणी सुरू आहे. खंडपीठाने राज्यातील पंचायतींना ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी वारंवार निर्देश दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याबद्दल खंडपीठाने संताप व्यक्त केला. खंडपीठाने कोलवा पंचायतीला वारंवार कचरा विल्हेवाट सुविधा उभी करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ दिली.

Court | Goa News
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्नी विरोधकांच्या पदरी निराशाच, वाढीव दिवसाला नकार

अनेकदा संधी देऊनही यंत्रणा उभी करण्यासाठी कोणतीच पावले उचलत नाहीत व फक वेळेवेळी कारणे दिली जात असल्याबद्दल कानउघाडणी केली. पंचायतीकडून दोन वेळा ही सुविधा उभी करण्यासाठी रक्कम जमा करण्यास लावली. मात्र, त्याचा काहीच परिणाम होत नसल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता सरपंचावरच ठोस कारवाई करण्याचा खंडपीठाने ठरवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com