बोनस मिळणार..पण ४६०० पेक्षा कमी वेतनश्रेणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

गोवा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना नॉन-प्रॉडक्टिव्हीटी लिंक्ड बोनस देण्याची घोषणा केली आहे. जे कर्मचारी ‘क’ वर्ग तसेच ‘ब’ वर्गामधील अराजपत्रित कर्मचारी आहेत व त्यांची वेतनश्रेणी ४६०० किंवा त्यापेक्षा कमी आहे (सध्याच्या ७ व्या वेतन आयोगाची वेतन मॅट्रिक लेव्हल) त्यांनाच हा बोनस मिळणार आहे.

पणजी : गोवा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना नॉन-प्रॉडक्टिव्हीटी लिंक्ड बोनस देण्याची घोषणा केली आहे. जे कर्मचारी ‘क’ वर्ग तसेच ‘ब’ वर्गामधील अराजपत्रित कर्मचारी आहेत व त्यांची वेतनश्रेणी ४६०० किंवा त्यापेक्षा कमी आहे (सध्याच्या ७ व्या वेतन आयोगाची वेतन मॅट्रिक लेव्हल) त्यांनाच हा बोनस मिळणार आहे, तर इतरांना तो लागू होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आळे आहे. सरकारकडून अंशतः किंवा संपूर्णपणे वित्त पुरवठा करणाऱ्या तसेच स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांना ही बोनस योजना लागू आहे. मात्र, त्यांनाही ही वरील अट लागू आहे. १ एप्रिल २०२० रोजी ज्या कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी ४६०० पेक्षा जास्त आहे ते या बोनससाठी पात्र नसतील. त्यामुळे काही सरकारी कर्मचाऱ्यांनाच या बोनसचा लाभ मिळणार आहे.

संबंधित बातम्या