राज्यात सरासरी दोन व्यक्तीमागे एक पुस्तक!

विलास ओहाळ
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

राज्याला अनेक नामवंत लेखक, कवी वारसा लाभला आहे. अनेक भाषांतून येथे साहित्य निर्माण झाले आहे आणि होत आहे. सध्या राज्यात मध्यवर्ती ग्रंथालयासह (सेंट्रल लायब्ररी) नावेली येथील जिल्हा ग्रंथालय , तसेच ‘अ’ श्रेणीची दोन आणि ग्रामीण भागातील ‘ड' श्रेणीत येणाऱ्या १४९ अशा एकूण १५३ ग्रंथालयांतून सुमारे ११ लाखांच्यावर पुस्तके उपलब्ध आहेत.

पणजी

राज्याला अनेक नामवंत लेखक, कवी वारसा लाभला आहे. अनेक भाषांतून येथे साहित्य निर्माण झाले आहे आणि होत आहे. सध्या राज्यात मध्यवर्ती ग्रंथालयासह (सेंट्रल लायब्ररी) नावेली येथील जिल्हा ग्रंथालय , तसेच ‘अ’ श्रेणीची दोन आणि ग्रामीण भागातील ‘ड' श्रेणीत येणाऱ्या १४९ अशा एकूण १५३ ग्रंथालयांतून सुमारे ११ लाखांच्यावर पुस्तके उपलब्ध आहेत. पाटो येथील मध्यवर्ती ग्रंथालय दरवर्षी १२ हजार ग्रंथसंपदा खरेदी करीत असते, त्यामुळे दरवर्षी वाचकांसाठी साहित्य वाचनासाठी उपलब्ध होत असून, याच ग्रंथालयाच्या माध्यमातून राज्यातील पंचायतीच्या आणि बिगर सरकारी संस्थांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या ग्रंथालयांना विविध जे अनुदान दिले जाते त्यातून वाचन चळवळ संस्कृती टिकविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते.
एका बाजूला समाज माध्यमांमुळे लोकांची वाचनातील रुची कमी होत असली तरी संदर्भग्रंथ किंवा नव्याने येणाऱ्या साहित्यविश्वाशी जोडले जाण्याकडे काही वाचकांचा सतत प्रयत्न असतो, असे सांगत सेंट्रल लायब्ररीचे क्युरेटर कार्लोस फर्नांडिस म्हणाले की, राज्यात ही सेंट्रल लायब्ररी नुकतीच वाचकांसाठी खुली झाली आहे. सामाजिक अंतर ठेवून वाचनालयात येणाऱ्या वाचकांच्या किंवा संदर्भग्रंथांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कला व संस्कृती खात्यांतर्गत या मध्यवर्ती ग्रंथालयाचे कामकाज चालविले जाते. त्यात राज्य सरकार जिल्हा वाचनालय, ग्रामीण भागात पंचायती आणि बिगर सरकारी संस्थांच्यावतीने ग्रंथालये चालवितात. त्यांना राज्य सरकार ग्रंथपाल आणि त्यांच्या सहकाऱ्याचे वेतन देते. त्याशिवाय अशा ग्रंथालयांना वर्षभरातील काही उपक्रम राबविणार असतील, तर अनुदानही देते. त्याशिवाय ग्रामीण भागातील ग्रंथालयात ग्रंथपाल आणि त्याचा साहाय्यक यांना राज्य सरकारतर्फे काही हजार रुपयांमध्ये पगाराची रक्कमही अदा केली जाते. मध्यवर्ती ग्रंथालयात २ लाख ९२ हजार ३४१ पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकांत दरवर्षी १२ हजार पुस्तकांची भर पडते. त्यात मराठी, हिंदी, कोकणी, इंग्रजी, कादंबऱ्या आणि बालसाहित्याचा समावेश आहे. ‘अ‘ श्रेणीच्या जिल्हा ग्रंथालयासह तीन ग्रंथालयात सुमारे २५ हजारांपर्यंत, तर १४९ ग्रामीण ग्रंथालयात
फर्नांडिस म्हणाले की, मध्यवर्ती ग्रंथालय साहित्यिक, लेखक, कवी यांना सतत प्रोत्साहन देते. त्या संस्था जर आपल्या कार्यक्षेत्रात काही वर्षभर साहित्याविषयी कार्यक्रम आयोजित करीत असतील तर त्यांना मध्यवर्ती ग्रंथालय मदत करते, असेही फर्नांडिस म्हणाले. राज्यातील एकूण पुस्तकांत महापालिका किंवा नगरपालिकांच्या ग्रंथालयांचा समावेश नाही, या ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या किमान १२ लाखांपर्यंत जाऊ शकते,
-----------------------------

  1. मध्यवर्ती ग्रंथालयातील साहित्य समृद्धी (२०२०-२१)
  2. इंग्रजी विषयाची ८९,५१४
  3. मराठी भाषातील ४९ ०९५
  4. कोंकणी भाषेची ५,७८०
  5. हिंदी भाषेतील ९,३३२
  6. कादंबऱ्या १०,०४१
  7. लहान मुलांची पुस्तके २९,४८०
Editing - Sanjay Ghugretkar

संबंधित बातम्या