Bjp In Goa: नरेंद्र सावईकर यांची पक्षनिष्ठा इतरांना प्रेरणादायी

Bjp in Goa: सदानंद तानावडे यांचे उद्‌गार: सावईकर यांच्या ‘काही मनातले...काही जनातले’ चे प्रकाशन
Bjp
BjpDainik Gomantak

Bjp Goa: गोव्याच्या राजकारणातील भारतीय जनता पक्षाचे तत्वनिष्ठ कार्यकर्ते व माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांनी पक्षाप्रती दाखवलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणा हा आजच्या काळातील युवा कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श असल्याचे उद्‍गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काढले.

खडपाबांध - फोंड्यात विश्‍व हिंदू परिषद सभागृहात (गुरुवारी) माजी खासदार नरेंद्र सावईकर यांचा वाढदिन सोहळा साजरा करतानाच त्यांनी लिहिलेल्या ‘काही मनातले...काही जनातले’ या पुस्तकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार उल्हास तुयेकर, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, माहिती आयुक्त ॲड. विश्‍वास सतरकर, माजी आमदार दामू नाईक व माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

तानावडे म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक राहून गोव्याच्या हिताचा नेहमीच विचार केला. सावईकर यांना मिळणारा सन्मान हे त्याचेच द्योतक आहे. लेखक होणे हे मोठे कठीण काम आहे, पण तेही नरेंद्र सावईकर यांनी सिद्ध करून दाखवले. सावईकर यांचे पुढील राजकीय भवितव्यही उज्ज्वल असल्याचे तानावडे म्हणाले.

Bjp
Galajibag Beach: ..यामुळे ऑलिव्ह रिडलेची 89 अंडी ‘आगोंद’ हून गालजीबाग किनाऱ्यावर स्थलांतरित

यावेळी विनय तेंडुलकर, दामू नाईक तसेच उल्हास तुयेकर यांनीही नरेंद्र सावईकर यांना शुभेच्छा देऊन एक संग्रही ठेवावे असे पुस्तक जनतेला दिल्याचे नमूद केले. स्वागत नरेंद्र सावईकर यांनी केले. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले. विश्‍वनाथ दळवी यांनी आभार मानले. दरम्यान, वाढदिनानिमित्त अनेकांनी सावईकर यांना शुभेच्छा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com