‘बूम लिफ्टर’ तुटून दोघा मजुरांचा मृत्यू

दोन मजूर काम करत असताना अचानक लिफ्ट तुटून खाली पडली.
‘बूम लिफ्टर’ तुटून दोघा मजुरांचा मृत्यू
Boom lifter breaks killing two workersDainik Gomantak

पणजी: आगशी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या क्रेनचे पार्टस् निखळण्याचे काम ‘बूम लिफ्टर’मध्ये (Boom lifter) बसून दोन मजूर (Wokers) करत असताना अचानक ही लिफ्ट तुटून खाली पडली. या दुर्घटनेत दोन मजूर गंभीर जखमी झाले. त्यातील एकाचा जागीच, तर दुसऱ्याचा इस्पितळात (Hospital) उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Boom lifter breaks killing two workers
जिवाचा गोवा करायला आलेल्या पर्यटकाला स्थानिकांनी दिला बेदम चोप

हा अपघात दुपारी 12 वाजता घडला. दुर्घटनेप्रकरणी आगशी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. आगशीचे पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या मजुरांची नावे सुशील कुमार यादव (30 वर्षे, उत्तरप्रदेश) व रवींद्र महतो (29 वर्षे, बिहार) अशी आहेत. एका मृतदेहाची शवचिकित्सा झाली आहे, तर दुसऱ्याची होणे बाकी आहे. दोन्ही मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com