बोरी पूल कमकुवत; खांब सरकल्याची माहिती

गंभीर मुद्दा ऐरणीवर; मुख्य अभियंता म्हणतात, ‘ताबडतोब दुरुस्त केला, आता धोका नाही’
Borim Bridge
Borim BridgeDainik Gomantak

पणजी : दक्षिण गोव्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या फोंडा-मडगाव मार्गावरील बोरी पुलाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. चार वर्षांपूर्वी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. यानंतर आता त्याचा एक खांब ‘जरा’ सरकला होता. ही गंभीर बाब मानली जाते. पण हा दोष निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्याची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम खात्याने केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बोरी पुलाच्या एका खांबामध्ये दोष आढळला होता. कंत्राटदाराने ही घटना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निदर्शनास आणली. त्यानंतर आठवड्याभरात हा दोष नाहीसा करण्यात आल्याचा दावा मुख्य अभियंते करीत आहेत. ही एक सर्वसाधारण घटना असल्याचे सांगून पीडब्ल्यूडीच्या अभियत्यांनी या प्रकरणाला बगल दिली. ‘आम्हाला एक किरकोळ दुरुस्ती करावी लागली. पुलाचा ‘रोलर’ घसरल्याचे आमच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यामुळे खांब कमकुवत बनला होता; परंतु आम्ही त्याची ताबडतोब दुरुस्ती करून घेतली. आता चिंता करण्यासारखे काही नाही’, अशी माहिती मुख्य अभियंता दिनेश गुप्ता यांनी दिली. तर ‘पुलाचा भार ज्या खांबावर अवलंबून असतो, तो ‘बॅरिंग’वर धरून ठेवलेला असतो. हा ‘रोलर’ किती सरकला आहे, याची जोपर्यंत माहिती मिळत नाही, तोपर्यंत पुलाच्या भवितव्यासंदर्भात काही बोलणे शक्य होणार नाही’, अशी माहिती एका अनुभवी अभियंत्याने सांगितले.

Borim Bridge
पंचायत निवडणुकीसाठी तब्बल 6,256 उमेदवारांचे अर्ज

पीडब्ल्यूडीने लोकांना उत्तरे द्यावीत

खांब धरून ठेवणारा ‘रोलर’ सरकणे किती धोकादायक आहे? गेल्या बुधवारी ‘रोलर’ सरकल्याची घटना निदर्शनास आल्यानंतर मुख्य अभियंता यांच्या मताप्रमाणे ताबडतोब तो प्रकार दुरुस्त करून घेण्यात आला. ‘रोलर’ सरकणे हा प्रकार दोन दिवसांत दुरुस्त करता येतो का? त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक योग्य आहे का? शिवाय पुलाच्या भवितव्यासंदर्भात तज्ज्ञांची मते घेणे सरकारला आवश्‍यक वाटत नाही का? असे काही प्रश्‍न यासंदर्भात निर्माण होत असून, पीडब्ल्यूडीने याची उत्तरे लोकांना देणे महत्त्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com