
जलस्रोत खात्याच्या फातोर्डा येथील कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या जयवंत नाईक (५९) याने आज सकाळी कार्यालयातच गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना घडली. याची माहिती मिळाल्यावर फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
जयवंत हा मूळ करमणे-काले येथील असून फातोर्डा येथे जलस्रोत खात्याच्या क्वार्टर्समध्ये राहात होता. सेवेतून निवृत्त व्हायला त्याला फक्त एकच वर्ष बाकी होते. मात्र, गेले काही दिवस तो मानसिक तणावाखाली वावरत होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
तो मधुमेहाचा रुग्ण होता आणि अधूनमधून त्याचा आजार बळावत होता, अशीही माहिती मिळाली. आज, शनिवारी कार्यालयाला सुट्टी असल्याने कोणीच नव्हते. सुरक्षा रक्षकाने दिलेल्या जबानीनुसार, त्याचे क्वार्टर्स कार्यालयाजवळच असून जयवंत सकाळी १० च्या सुमारास कार्यालयात गेला. बराच वेळ होऊन तो परत आला नाही म्हणून सुरक्षा रक्षक त्याला पाहायला वर गेला असता, जयवंत एका केबिनमध्ये दोरीला लटकताना दिसला.
कॅसिनोतील नेपाळी तरुणीने केला जीवनाचा अंत-
कॅसिनोमध्ये कामाला असलेल्या एका नेपाळी तरुणीने सांतिनेझ येथे राहात असलेल्या फ्लॅटमध्ये पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. पणजी पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे. तिच्या मृत्यूमागील कारणाचा तपास सुरू असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव श्रुती श्रेष्ठ असे असून ती कॅसिनोमध्ये कामाला होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.