चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला

Mapuca Bjp
Mapuca Bjp

म्हापसा
राष्ट्रहितार्थ म्हापसा येथे आयोजित एका उपक्रमाच्या अंतर्गत भाजप कार्यकर्त्यांनी चिनी राष्ट्रध्वज व चीनच्या पंतप्रधानांच्या छायाचित्राची होळी केली त्यावेळी श्री. फळारी बोलत होते. चिनी वस्तू न वापरण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ता असलेले नगरसेवक राजसिंह राणे, भाजप म्हापसा मंडल अध्यक्ष सुशांत हरमलकर, माजी नगराध्यक्ष रोहन कवळेकर, हृषिकेश घाडी, रोशन नाईक, भारती पार्सेकर, देवानंद हरमलकर, वल्लभ नागवेकर, शुभम पार्सेकर, तन्वेश केणी तसेच महिला व युवा विभागाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. चिनी सैन्याने भारतावर केलेल्या आक्रमणाबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी तीव्र संताप व्यक्‍त केला.
नगरसेवक संदीप फळारी पुढे म्हणाले, की चीनने आपल्या देशावर वेळोवेळी आक्रमणे केली आहेत. या पार्श्‍वभूमीवर अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्य राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले होते. तरीसुद्धा चीनने सुमारे सात आठ दिवसांपूवीं आपल्या भारत देशाचा मोठा विश्‍वासघात केला आहे. त्या परिस्थितीत आपल्या भारतीय जवानांनी चांगल्या प्रकारे चीनला यथोचित प्रतिकार केलेला आहे. देशादेशांमध्ये सामंजस्य राखण्याच्या भारताच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न चीनकडून झाला, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाने व आपल्या जवानांनी त्यांना चांगल्यापैकी प्रत्युत्तर दिले. त्या जवानांचे बलिदान कदापी व्यर्थ ठरणार नाही.
नगरसेवक सुशांत हरमलकर म्हणाले, की चीनची अर्थव्यवस्था खाली आणून भारताची अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास भारतीयांच्या दृष्टीने हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे आम्ही चीनच्या वस्तू व त्यांच्या पंतप्रधानांचा फोटो जाळून त्या देशाचा निषेध व्यक्‍त केला आहे.

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com