गोव्यातील महिला सांगताहेत धोरण कसे असावे..!

जनमन उत्सव गोव्यातील 3 लाख महिलांची मते जाणून घेणार
गोव्यातील महिला सांगताहेत धोरण कसे असावे..!
जनमन उत्सवDainik Gomantak

मडगाव: गोव्यातील 3 लाख महिलांची मते जाणून घेऊन त्याद्वारे गोव्यासाठी पोषक धोरणे आखण्यासाठी गोमन्तकने सुरू केलेले जनमन उत्सव सर्वेक्षणाची आज (रविवारी) कुडतरी मतदारसंघात सुरवात झाली. दक्षिण गोव्यातील या सर्वेक्षणा अंतर्गत आलेला हा सातवा मतदारसंघ आहे. आतापर्यंत मडगाव, फातोर्डा, नावेली, दाबोळी, वास्को व केपे मतदारसंघात हे सर्वेक्षण झाले असून, उत्तर गोव्यातही हे काम सुरू आहे.

कुडतरी मतदारसंघात पाचभाट, वागुळे, विराभाट व एकलाती या परिसरात हे सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणात गृहिणी तसेच महिला गटांच्या सदस्यांनी भाग घेतला. या सर्वेक्षणात महिकांना त्यांच्या कल्पनेतील गोवा कसा असावा याबद्दल प्रश्न विचारले जात असून राज्याचे धोरण कसे असावे याबद्दल त्यांचे मत आजमावले जात आहे. आतापर्यंत गोव्यातील विविध भागातून या सर्वेक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.

आज झरीवाडा दवर्ली येथील महिलांनीही या सर्वेक्षणात भाग घेतला. या सर्वेक्षणातून महिकांच्या आकांक्षांना एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न होणार आहे. दाबोळी मतदारसंघात आज आधारनगर, केशवस्मृती विद्यालय, आसय डोंगरी तसेच दाबोळी रेल्वे स्टेशन परिसर येथे सर्वेक्षण करून महिलांची मते नोंदवून घेतली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com