पावाची विक्री पाच रुपयानेच!

ऑल गोवा बेकर्स संघटनेतील फूट शमली असल्याने पावाच्या विक्रीबाबत राज्यव्यापी निर्णय घेण्यात आला
पावाची विक्री पाच रुपयानेच!
Bread sold in Goa for five rupeesDainik Gomantak

पणजी: पावाच्या किमतीबाबतचा (Pav) संभ्रम दूर झाला असून पाव राज्‍यभरात (Goa) पाच रुपयांनाच मिळणार हे आता निश्‍चित झाले आहे. ऑल गोवा बेकर्स संघटनेने (All Goa Bakers) तसा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे संघटनेत असलेली फूट शमली असल्याने हा राज्यव्यापी निर्णय घेण्यात आला आहे.

1 ऑक्टोबरपासून राज्यात पावांचे दर वाढणार असल्याचे संघटनेने जाहीर केले होते. प्रत्यक्षात काही भागात पावांचे दर वाढविण्यात आले. काही भागात जुन्याच दराने पाव विकले जात होते. विशेषतः परप्रांतीय पाव निर्मात्यांकडून पावांचे दर जैसे थे ठेवण्यात आले होते. त्यामुळे पारंपरिक पाव निर्मात्यांची गोची झाली होती. मुदलात संघटनेतील फुटीमुळे हा गोंधळ सुरू होता. त्यावर तोडगा काढत संघटनेने एकत्रितपणे दरवाढीचा निर्णय जाहीर केला आहे.

Bread sold in Goa for five rupees
पाव होणार पाच रुपये

राज्यात 1 नोव्हेंबरपासून 50 ग्रॅम पावाचा दर 5 रुपये इतका राहणार आहे, तर घाऊक बाजारात तो 4 रुपये किमतीने विकला जाणार आहे. एकीकडे गृहोपयोगी साहित्याचे दर गगणाला भिडत असतानाच गोमंतकीयांच्या आवडीच्या पावाचे दरही वाढल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Bread sold in Goa for five rupees
पावाच्या किंमतीवरून बेकर्स संघटनांमध्ये मतभेद

...तर कारवाई करणार!

पाव हा राज्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, सध्या या व्यवसायात परप्रांतीयांनी जम बसविला आहे. परप्रांतीय व्यावसायिक दहा रुपयांना तीन म्हणजेच सरासरी तीन रुपयांना पावाची विक्री करतात. त्यामुळे पारंपरिक गोमंतकीय बेकरी मालकांची गोची होत आहे. संघटनेचा आदेश डावलून कमी दराने पाव विक्री करणाऱ्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय यावेळी संघटनेने घेतला आहे.

Related Stories

No stories found.